करमाळा प्रतिनिधी केम रेल्वेसेवा थांबे कोविड चे निर्बंध हटवून पूर्ववत सर्व गाड्या थांबण्यात यावें यासाठी केम रेल्वे प्रवासी संघटना व सर्व राजकीय पक्ष प्रहार संघटना, शिवसेना, बहुजन संघटना, अनेक बहुउद्देशीय संस्था,व इतर व्यापारी असोसिएशन संघटने यांनी माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक DRM शैलेंद्र गुप्ता मध्य रेल्वे सोलापूर यांना निवेदन देण्यात आले*
. केम गाव हे करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे ,यांच्या आजूबाजूला असणारी दहा ते पंधरा गावे ही या गावावर अवलंबून आहेत कोविडच्या महामारीमुळे सर्व कोरोना काळापूर्वी हैदराबाद मुंबई एक्सप्रेस मुंबई हैदराबाद एक्सप्रेस चेन्नई मुंबई एक्सप्रेस मुंबई चेन्नई एक्सप्रेस साईनगर शिर्डी या सर्व रेल्वे गाड्यांचा केम स्थानकावर थांबा होता. परंतु कोणतेही पूर्व सूचना न देता रेल्वे प्रशासनने थांबा बंद करण्यात आला. केम हे मध्ये रेल्वे महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून करमाळा तालुक्यातील हे पंचक्रोशी मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे येथे जगप्रसिद्ध कुंकवाचे सौभाग्याचे लेने आहे. या गावात तीस ते पस्तीस कुंकू कारखाने आहेत हे कुंकू भारतामध्ये रेल्वेने सर्वत्र पाठवले जाते परंतु रेल्वे विभागाने पार्सल ऑफिस व तिकीट बुकिंग सेवा बंद केल्या आहेत या गावात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. वीट भट्टी कामगार,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेत त्यामुळे पुणे मुंबई सोलापूर शिर्डी व तिरुपती बालाजी या ठिकाणी प्रवास करणारे विद्यार्थी कामगार नोकरवर्ग शेतकरी वर्ग कुंकू कारखाना देवदर्शन ला जाणारे वारकरी व अनेक ज्येष्ठ मंडळी यांची रेल्वे थांबा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. गावातील अनेक व्यवसाय धंदे बंद पडले आहेत व ग्रामीण भागातील मुलं मुली येण्या जाण्याची सोय नसल्याने पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. केम व आजू बाजूच्या गावातील नागरिकांनी दहा ते पंधरा वर्षे पाठपुरावा करून नागरिकांनी रेल्वे थांबण्यासाठी वर्गणी गोळा करून सहा ते सात महिने तिकीट स्वतः काढली होती .त्या पाठपुरामुळे या सर्व गाड्यांना रेल्वे प्रशासन कायमस्वरूपी थांबा मिळाल्याचे पत्र रेल्वे प्रशासन केम प्रवासी संघटनेला मिळाले होते रेल्वे प्रशासन कोरोना काळात नंतर सर्व रेल्वे गाड्या सुरू झाल्यापासून आम्ही वेळोवेळी गावातील अनेक नागरिकांनी व प्रवासी संघटनेने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्र व्यवहार करूनही या गाड्यांचा केम स्थानकाला थांबा मिळाला नाही या गावातील लोकांचे व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील व्यापारी वर्गाला रेल्वे थांबा नसल्यामुळे उद्योगधंद बंद पडले आहेत बेरोजगार होऊन नुकसान होत आहे सुविधा बंद झाल्याने सर्व गंभीर बाबींचा विचार करून आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून रेल्वे स्थानकावर या सर्व रेल्वे कायमस्वरूपी थांबा मिळावा ही विनंती.असे निवेदन दिले त्यावेळी माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापन DRM शैलेंद्र गुप्ता साहेब यांनी सांगितला आहे की कोविड निर्बंध रेल्वे बोर्डने हट्टवल्यानंतर तुमच्या सर्व गाड्या चालू होतील तत्पूर्वी तुम्हाला जाण्या येण्यासाठी तुमच्या टाईम मध्ये पुणे व सोलापूर जाण्यासाठी तात्पुरता मार्ग लवकरात लवकर काढू अशी आश्वासन देण्यात आले. त्यावेळी उपस्थितत्यावेळी उपस्थित केम रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार ओहोळ, सिराज मोमीन,उपाध्यक्ष संदीप भाऊ तळेकर सचिव सागर राजे तळेकर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सागर राजे दोंड, खजिनदार महादेव पाटमास, केम गावचे माजी सरपंच अजितदादा तळेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ए.पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, मार्केट सदस्य महावीर आबा तळेकर, चेअरमन आनंद शिंदे,भाजप तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, केम ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर,सचिन रणशिंगारे, धनंजय घाडगे, प्रहार संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार, संतोष पाटील,सोलापूर प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, संपर्कप्रमुख जमीर भाई शेख, कार्याध्यक्ष खालीद भाई मणियार, युवा जिल्हाध्यक्ष मोहसीन भाई तांबोळी, प्रहार सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, माजीत पटेल, मुज्जू हुंडेकरी समर्थ गुंड, सचिन माने, नागेश घाडगे, युनूस पठाण,व इतर सर्व संघटनेचे व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…