आमचा नाथपंथी डवरी बहुरुपी समाज शासनाने आम्हाला न्याय द्यावा- साहेबराव शेगर खडकी       

करमाळा प्रतिनिधी साहेब  आमचा बहुरूपी समाज  छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासुन शत्रुच्या गोठात जाऊन गुप्त माहिती काढण्याचे काम आमचे पुर्वज करीत होते त्याकाळी राजाश्रय मिळत होता त्यामुळे आमच्या पुर्वजाची उपजिविका चालत होती.सध्याच्या परिस्थितीत आम्हाला कुठल्याही प्रकारचे शासनाकडुन सहकार्य मिळत नसल्याने तसेच जगण्याचे साधन नसल्यामुळे आमची परिस्थिती बिकट झाली आहे.आमचा बहुरूपी समाज सध्याच्या परिस्थितीत समाजाला मनोरंजनाबरोबर समाज घडवण्याचे काम करत असल्याचे बहुरुपी साहेबराव शेगर रा.खडकी बहुरुपी इन्सपॅक्टेरचे काम करीत आहे. आमच्या आजोबाच्या काळापासुन काम करीत असुन आम्हाला घर नाही दार नाही रेशनकार्ड नाही जातीचा दाखला आम्हाला मिळत नाही साठ वर्षाचा पुरावा आमच्याकडे मागत आहे.आमची भटकी जात कुठुन पुरावा आणायचा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमची बहुरुपी कला असुन याला राजाश्रय मिळावा आमच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी आम्ही समाजाला दिशा देण्याचे काम करीत आहे.एकतर पोलिसाची लोकांना भिती असल्याने जेथे पोलिस जाऊ शकत नाही अशा वाड्या वस्त्यावर जाऊन गुन्हेगारी कमी करण्याचे काम केले आहे.शासनाने आम्हाला या विभागात मानधनावर तत्वावर सामावुन घ्यावे आमच्या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी विजय शेगर यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago