Categories: करमाळा

करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण संप्पन

  करमाळा  प्रतिनिधी  तहसील करमाळा कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण संप्पन करमाळा प्रतिनिधी करमाळा तहसील कार्यालय येथे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते सोमवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व करमाळा शहरातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणात हा उत्सव झाल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते.देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी सर्वत्र विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. प्रशासनाच्या वतीनेही विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. ध्वजवंदन झाल्यानंतर ‘तंबाखू मुक्तीची शपथ’ घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार व उपस्थित सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, निवासी (महसूल) तहसीलदार सुभाष बदे, सहायक निबंधक दिलीप तिजोरे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड डॉ. बाबुराव हिरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, विवेक येवले, चंद्रशेखर शिलवंत, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस अमरजित साळूंखे, राष्ट्रवादीचे अशपाक जमादार, अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार, नगरसेवक अतुल फंड, प्रविण जाधव,नानासाहेब मोरे  राष्ट्रीय  सेवा योजनेचे प्रा. डॉ. लक्ष्मण राख, जेलर समीर पटेल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साने आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने करमाळा तालुकाचा ऐतिहासिक वारसा सांगणारे फलक, स्वातंत्र्य सैनिकांची माहिती सांगणारे फलक यावेळी लक्ष वेधत होते. स्वातंत्र्य दिनानिमीत्त करमाळा तहसील, पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग येथे विद्यूत रोषणाई करण्यात आली असुन याबरोबर फुग्याने कार्यालय सजवण्यात आले होते.करमाळा पोलिसांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मानवंदना दिली. यावेळी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालात राष्ट्रगीत सादर केले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन महसुलाचे अधिकारी संतोष गोसावी यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago