करमाळा शहरात युवा नेते शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा ध्वज यात्रा


करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात 15 ऑगस्ट,2022 रोजी  स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवानिमित्त भव्य तिरंगा ध्वज यात्रा श्री.शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या तिरंगा ध्वज यात्रेस करमाळा तालुक्यातील व शहरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 325 फूट लांबीच्या या तिरंगा यात्रेची सुरुवात महात्मा गांधी विद्यालयातील राष्ट्रीय ध्वज फडकवल्यानंतर करण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भारत देशात होऊन गेलेल्या महापुरुषांचे व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. त्यांनी तिरंगा ध्वज यात्रेची शोभा वाढवली.
तिरंगा ध्वज यात्रा करमाळा शहरातून जात असताना करमाळा शहरातील नागरिकांनी हा डोळे दिपवणारा क्षण कोणी कॅमेरा मध्ये क्लिक केला तर कोणी स्वतः तिरंगा सोबत विविध पोषक परिधान केलेल्या विद्यार्थ्यांसोबत फोटो काढून या यात्रेमध्ये सहभागी झाले. शंभूराजे जगताप यांनी स्वतः यात्रेमध्ये पुढे उभे राहून पांढरा कुर्ता ,पांढरे धोतर व डोक्यावर पांढरी टोपी परिधान केली होती. करमाळा शहरातील काही मंडळींनी शंभुराजेंना आपण हुबेहूब देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप साहेबांसारखे दिसत आहात अशी उपमा दिली. शंभूराजेंनी या यात्रेमध्ये चालत असताना लहान चिमुरड्यांना, हात गाडीवाले, सफाई कामगारांना, पोलीस,होमगार्ड,करमाळा शहरातील नागरिकांना गुलाब देऊन “75 स्वातंत्र्य महोत्सवाच्या “खूप सार्‍या शुभेच्छा दिल्या आहे

saptahikpawanputra

Recent Posts

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

9 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

15 hours ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

1 day ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

2 days ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago