दत्तपेठ तरुण मंडळाचा दहीहांडी उत्सव कोरोनामुळे मागील दोन वर्ष पडलेल्या खंडानंतर आनंदात मोठया उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दत्तपेठ तरुण मंडळ यांच्या वतीने कोरोना मुळे मागील दोन वर्ष पडलेल्या खंडानंतर यावर्षी दहीहंडी उत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला..या दहीहंडी मोहत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी श्रीमंत राजे रावरंभा तरुण मंडळ गोविंदा पथक , श्री देवीचामाळ, मंगळवार पेठ गोविंदा पथक, रुपचंद तालीम गोविंदा पथक यांच्यासह इतर अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला.. बऱ्याच गोविंदा पथकांनी तीन – चार थर लावण्यात यशस्वी झाले.परंतु दहीहंडी फोडण्याचा मान श्रीमंत राजे रावरंभा तरुण मंडळ देवीचा माळ या गोविंदा पथकाला मिळाला. विजेता गोविंदा पथकाला दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने ट्रॉफी व बक्षीस रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.. या कार्यक्रमात भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत, तसेच गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, भावी नगरसेवक अमोलजी परदेशीं, तालुका शिवसेना प्रमुख सुधाकर काका लावंड, मनसे अध्यक्ष नानासाहेब मोरे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

दोस्ती बेंजो पथकाने आपल्या सुमधुर संगिताने दहीहंडी कार्यक्रमात रंग भरला.. या दहीहंडी उत्सवात युवा नेते शंभूराजे जगताप, टायगर ग्रुप चे डॉ. तानाजीभाऊ जाधव,माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत,ऍड. कमलाकरजी वीर, भाजप चे तालुका अध्यक्ष गणेश जी चिवटे,नगरसेवक सचिनजी घोलप, सामाजिक कार्यकर्ते विजयरावं लावंड,, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार सिध्दार्थ वाघमारे इंजि. राजेंद्र परदेशीं श्री देवीचामाळ सरपंच महेशजी सोरटे, विनयजी ननवरे, आशपाकजी जमादार यांचेसह अनेक मान्यवरानी भेटी देऊन दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला. यावेळी पोलीस स्टेशन, करमाळा यांनी सहकार्य करून चोख बंदोबस्त ठेवला.
दत्त पेठ तरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते सर्व सन्माननीय अतिथीचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अरुणजी टांगडे, चरण परदेशीं, संग्रामजी देशमुख, भूषण खुळे,छोटू परदेशीं, अभयजी महाजन,धनंजय महाजन,रामा टांगडे, सचिन भणगे,ओंकार चोपडे,अभि भणगे,दत्ता काटकर सतीश फंड,अजिंक्य महाजन नितेश देवी,घोडेगावकर आदींनी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला. या उत्सवात शहरातील अनेक राजकीय, सामाजिक, व्यापारी क्षेत्रातील महिला पुरुषांनी दहीहंडी पाहण्यासाठी उपस्थिती लावली.. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचलन दत्ता काटकर यांनी केले.. ऍड. संकेत खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

2 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago