करमाळा प्रतिनिधी श्री कमलाभवानी बहुउद्देशी संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालय करमाळा यांच्यावतीने पंडित कै. के एन बोळंगे गुरुजी कै.पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करमाळा येथील प्राथमिक शिक्षक जिल्हा सोसायटी इमारतीमध्ये श्री देवीचामाळ रोड येथे संपन्न झाला या महोत्सव साठी देशातील वेगवेगळ्या राज्यातून आणि परदेशातूनही अनेक दिग्गज कलाकार यांनी हजेरी लावली. सूरताल संगीत विद्यालयाचे वतीने संगीत क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सुर सरस्वती या पुरस्काराने डॉक्टर सुनिता जमदाडे कथक नृत्यांगना पुणे कलकत्ता येथील भारतीय समकालीन नृत्यांगना रूपा कौर मुंबई येथील कथक नृत्यांगना मनीषा पात्रीकर सोलापूरचे भरतनाट्यम कलाकार नर्तकार श्रीनिवास काटवे बांगलादेशच्या गीत गायिका रुकसाना यास्मिन नजरुल कलकत्ता येथील कथक नृत्यांगना मधुमिता कर्मकार मुंबई येथील कथक नृत्यांगना हर्षिता हाटे भरतनाट्यम नृत्यांगना दिल्ली जागृती भटनागर ओडिसी नृत्यांगना भुवनेश्वर ओरिसा शुभ श्री जयसिंग यांना सुलताल संगीत विद्यालयाच्या वतीने सुर सरस्वती अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देण्यात आले. पुरस्कारप्राप्त कलाकारांनी आपली कला सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या समारंभाप्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरताल संगीत विद्यालयाने संगीत क्षेत्राच्या माध्यमातून व कलेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राज्याच्या सीमा पार केल्या असून संगीत हे मानवाला एकत्र आणण्याचे एक प्रभावी साधन असून सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन 25 हजार रुपयाची मदत त्यांनी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने जाहीर केली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर,नगरसेविका स्वातीताई फंड,महादेव फंड भाजपचे प्रदेश सरचिटणीस दिपक चव्हाण साहित्यिका अंजली श्रीवास्तव पत्रकार दिनेश मडके नरेंद्र ठाकुर,संघर्ष न्युजचे सिध्दार्थ वाघमारे शितल मोटे बाळासाहेब गोरेगुरूजी,सुनील वाशिंबेकर विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर म्हणाले की बाळासाहेब नरारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याचे नाव महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशात करण्याचे काम केले असून त्यांच्या कार्याचा आपणास सार्थ अभिमान वाटतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर सूत्रसंचालन संतोष पोतदार गुरुजी स्वागत लक्ष्मण लष्कर गुरूजी डाॅ.महेशचंद्र वीर ह.भ.प.नाना पठाडे यांनी तर आभार दिगंबर पवार सर यांनी मानले.
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…