लोकनेते,कार्यसम्राट,विकासरत्न,पाणीदार,जनतेचे आमदार..मा.श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील
*”मा.श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील”यांचा आज जन्मदिवस…*करमाळा तालुक्यातील विकासाची २०१४-२०१९ हा काळ गाजवलेली व्यक्तीकरमाळा तालुक्याचे विकासरत्न मा.श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील यांचा आज जन्मदिन आणि या जन्मदिनाच्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…
*मतदारसंघातील जनतेने आगदी त्यांच्या कार्याला बघून एक नाही तर अनेक पदव्या दिल्या.कार्यसम्राट, पाणीदार,विकासरत्न, लोकनेते,रोडकिंग,जनतेचे आमदार ह्या पदव्या फक्त आणि फक्त जनतेची सेवा केल्याने मिळाल्या.आणि ह्या पडव्या जनतेच्या प्रपंचाच्या चुलीत पाणी ओतून व त्या भोळ्या-भाबड्या जनतेला फसवुन नाहीत मिळत.*
२०१४-२०१९ हा कालावधी जर सोडला तर मागील वर्षांच्या या कालावधीत तालुक्यात श्री.नारायण(आबा)पाटील नावाची “पोकळी निर्माण झाली” तालुक्याचा विकास हे वाक्य कानावर कधीच ऐकायला मिळाले नाहीत मात्र तालुक्याच वाटोळं झालं ही चर्चा साध्य सर्वसामान्य जनतेतून ऐकायला मिळायाला लागली.पण वास्तविक सद्यस्थितीचा विचार करत असताना जेव्हा मन सामाजीक व राजकीय प्रश्नांकडे वळते,तेव्हा सर्व मतभेद विसरून राजकारणापलीकडे जाऊन खंबीर नेतृत्व करणारे मा.श्री.नारायण(आबा)पाटील हे आज आमदार असायला हवे होते,याचा प्रत्यय मात्र क्षणोक्षणी आल्याशिवाय राहत नाही.
*जनसामान्यांचे प्रश्न सोडवून लाखोंची गर्दी जमवणारे दर्दी लोकनेते म्हणजे कार्यसम्राट ”मा.श्री.नारायण(आबा)गोविंदराव पाटील”तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,कष्टकरी व तळागाळातील जनतेसाठी जीवनभर संघर्ष करणारे आबा म्हणजे संघर्षमय परिस्थितीला शेवटपर्यंत तोंड देत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ”मसिहाच”वाटतात.*
आबांच्या रुपाने करमाळा तालुक्यातील जनतेला एक संघर्षशील नेता लाभला.मुठभर कार्यकर्ते पेरून,मनभर जन-आशिर्वाद मिळवणारे नेतृत्व दुहेरी हाडामासाचे राजकीय नेतृत्व.
सत्ता असो किंवा नसो सर्वसमावेशक समाजाच्या हिताच्या बाजूने कौल देण्याचे कार्य आबांनी नेहमीच केले.आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबरचं २०२४ च्या आमदारपदी विराजमान होण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.कारण की लबाड मंडळींना जनतेने आत्ताच खड्यासारखं बाहेर काढून टाकलं आहे.
*आपल्या कारकिर्दीत या माणसाने अक्षरशःपायाला भिंगरी बांधून जी अशक्य असणारी जनतेची कामे चुटकीसरशी सोडवताना या तालुक्यातील जनतेने पाहिले आहे.अगदी सर्वसामान्य कुटुंबातून करमाळा तालुक्यातील लव्हे या छोट्याश्या खेड्या-गावातून थेट मुंबई पर्यंतचा जीवनप्रवास हा एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणेच प्रेरणादायी आहे.*
जन्म-भूमी जरी लव्हे गाव आसल तर कर्मभूमी ही त्यांची जेऊर आहे.पूर्व भागात दहिगाव योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या दारोदारी गंगा आणली तर पश्चिम भागात रस्त्याचे जाळे व चांगल्या-चांगल्या रती महाराती यांनी फक्त आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करून दिलेली पुलांची कामे श्री.नारायण(आबा)पाटील आपण पूर्ण करून सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले.येणाऱ्या काही दिवसात आदिनाथ नावाचं शेतकऱ्यांचं मंदिर आपण वाचवाल एवढीच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची इच्छा आपण पूर्ण कराल याच आपणास पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
*श्री.संजय सुभाष फडतरे,*
*पोमलवाडी,ता.करमाळा,जि. सोलापूर.*
करमाळा प्रतिनिधी मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने प्रती वर्षाप्रमाणे दि. ६ जानेवारी २०२५…
करमाळा प्रतिनिधी- भाजपा नेते,भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती करमाळा भाजपाकडून विविध कार्यक्रमांनी…
करमाळा प्रतिनिधी गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे उप प्रवर्तक प. पु. श्रुत मुनीजी म.सा…
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी सोलापूर पश्चिमच्या जिल्हा चिटणीसपदी विनोद महानवर यांची निवड जिल्हाध्यक्ष चेतनसिंह…
करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी…