करमाळा प्रतिनिधी ‘घर बांधण्यासाठी आई- वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये’, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी नवऱ्यासह सासू, सासरा व नोंदवा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील सातोली येथील एका विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात २१ वर्षाची विवाहित बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. त्याचप्रकरणात आता नवऱ्यासह चौघांवर शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीचा विवाह सातोली येथील विष्णू भगवान मुरूमकर यांचा मुलगा वैभव विष्णू मुरूमकर यांच्याशी झाला. 2018 मध्ये हा विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर एक महिना त्यांनी मला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर नवरा, सासरा, सासू व नंदावा अनिल बापू भोसले (रा. दहिवली) यांनी छळ सुरु केला.
घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण हाकलून दिल आई- वडिलांच्या घरी गेले. आई- वडिलांना सर्व सांगितले. काही दिवसानंतर नवऱ्याच्या घरी आले तेव्हा नवरा, सासू व सासरा यांनी सांगितले की, माझे वडील गरीब असल्याने त्यांच्याकडे एक लाख रुपये नाहीत तेव्हा ते पैसे देऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांनी मला घरात घेतले व काही दिवसानंतर पुन्हा शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवून मला शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादिने म्हटले आहे या प्रकरणात आता नवऱ्यासह चौघांवर शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करमाळा प्रतिनिधी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान भक्त सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील विविध मंजुर विकासकामा संदर्भात व प्रस्तावित कामांचे मंजुरी बाबत आज देवगिरी…
करमाळा प्रतिनिधी नम्रता गुणवत्ता विद्ववत्ता याचा तिहेरी संगम म्हणजे मुख्याध्यापिका हेमा विद्वत मॅडम वरकुटे ता…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रा निकत सरांचे ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट मध्ये 12 जानेवारी रोजी माँ…
करमाळा प्रतिनिधी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने समाजाला गरज । असून आदर्श राष्ट्र समाज…
करमाळा प्रतिनिधी: ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला…