करमाळा: सातोली ता. करमाळा येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सातोली ग्रामविकास आघाडी ने बहुमत प्रस्थापित करून वर्चस्व सिध्द केले होते. कै.शंकरराव साळुंके (बापू) यांच्या विचारांची सातोली ग्रामविकास आघाडी, सातोली या पॅनलचे प्रमुख श्री दिगंबरराव साळुंके यांच्या मार्गदर्शन व नियोजना खाली ही निवडणूक पार पडली.
सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पद हे अनुसूचित जाती साठी आरक्षित असल्याने व त्या ठिकाणी ग्रामविकास आघाडीचाच मनोहर कदम हा फक्त एकमेव उमेदवार निवडून आलेला असल्याने त्याची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडी चे भास्कर खुपसे यांचा यांचा अर्ज आला होता त्यामध्ये खुपसे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वनिता पाडसे, पल्लवी फरतडे, रोहिणी साळुंके, वैशाली भोगे, विजय साळुंके उपस्थित होते.ग्रामपंचायत निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमरजित साळुंके, अजिनाथ फरतडे, राहुल चव्हाण, प्रविण साळुंके, सुहास फरतडे, संग्राम साळुंके, महादेव साळुंके, अशोक मुटेकर, राजाभाऊ साळुंके, नवनाथ फरताडे, रोहिदास चव्हाण, अनिल यादव, उमेश साळुंके, कल्याण फरतडे, ब्रह्मदेव साळुंके, महारुद्र मेटे, विकास पाडसे, गणपत चव्हाण, राम मस्के, बापू जाडकर, अण्णा गावडे, अरुण गाडे, मोहन गाडे आदींनी परिश्रम घेतले.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून के. के. खराव व सहकारी तलाठी उमेश बनसोडे, ग्रामसेवक तळेकर यांनी काम पाहिले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…
* करमाळा प्रतिनिधी “भारतीय डाक विभागाच्या विविध बचत, विमा आणि आर्थिक सुरक्षा योजना ग्रामीण भागातील…
करमाळा प्रतिनिधी वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि…