करमाळा प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी व आमची युवा सेना कार्यरत आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक नाहक शिंदे गटासोबत असल्याच्या वावड्या उठवित आहेत. काही वर्तमान पत्रात, मोबाईल पेजवर आमच्या परस्पर जाहिराती प्रसिद्ध करीत आहेत. परंतु आम्ही कालही, आजही आणि उद्याही फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहणार आहे.
आमचे पक्ष संघटन जोमाने सुरु असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमच्या कार्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न फसल्याने विरोधकांनी खोट्या वल्गना करून आमचे राजकीय जीवन संपविण्याचा जो केविलवाना प्रयत्न चालू तो तात्काळ थांबवावा आम्ही तुमच्या कुरघोड्याने पक्षाचे काम थांबवणार नसून आणखी जोमानेकाम करु. करमाळयात शिवसेना मजबूत करून विरोधकांना आम्ही (शिवसेना महिला आघाडी व युवा सेना) कामाच्या जोरावर त्यांच्या जोरदार चपराक लावणार असल्याचे कणखर प्रतिपादन यावेळी गायकवाड यांनी घेतले.
यावेळी महिला तालुका उपप्रमुख साधना गोसावी, प्रियांका पवार, शहर प्रमुख रेखा परदेशी, युवा सेना जिल्हा उपप्रमुख मयूर यादव, तालुका प्रमुख राहूल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, तालुका समन्वयक दादासाहेब तनपुरे, उपशहर प्रमुख प्रसाद निंबाळकर, मनिषा कारंडे, सुवर्णा सुरवसे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…