साडे हायस्कुलची गौरवशाली पंरपंरा गटविकास अधिकारी मनोज राऊत

करमाळा प्रतिनिधी साडे हायस्कुल साडे या प्रशालेची गौरवशाली पंरपंरा असुन‌ ग्रामिण भागात अनेक सुविधाचा अभाव असताना शैक्षणिक क्षेत्रात कायम ठसा उमटवुन नावलोकिक प्राप्त करण्याची पंरपंरा ग्रामीण भागातील शाळासाठी आदर्शवत आहे असे गौरवद्गागार पंचायत समितीचे गटविकास मनोज राऊत यांनी व्यक्त केले                                                                साडे   ता.करमाळा येथील व्यायामशाळेच्या कवायतप्रसंगी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे मेघराज उद्योग समुहाचे हनुमंत पाटील बॅंकेचे निवृत अधिकारी नारायण गावडे,उपस्थित होते तर व्यासापिठावर श्री.यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोकुळराव पाटील,सचिव देविदास ताकमोगे सर जेष्ठ संचालक डाॅ.वसंतराव पुंडे उपाध्यक्ष बाजीराव माने उद्योजक युवराज गोमे,सामाजिक कार्यकर्त दत्तात्रय रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की साडे हायस्कुल साडे हे तालुक्यातील नव्हे तर जिल्हयातील आदर्श शाळा म्हणुन गणली जात आहे.या परिसरातील गोरगरीब विद्याथ्याना उत्तम शिक्षण देण्याचे काम विद्यालयामार्फत अविरतपणे केले जात आहे.या शाळेचे विद्यार्थी राज्यभर आज वेगवेगळया मोठमोठ्या पदावर कार्यरत आहे ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे.या शाळेचा विद्यार्थी म्हणुन मला याचा अभिमान वाटतो.आज सगळीकडे खाजगी शाळाचे प्राबल्य वाढत असताना या शाळैने मात्र आपली गुणवत्ता आणि दर्जा कायम राखत आपला नावलौकीकाचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना करसल्लागार आनंद गावडै म्हणाले की ग्रामिण व शहरी याबाबत विचार केला जातो तेव्हा ग्रामिण भागात सुविधाचा अभाव असल्याचे कारण सांगितले जाते मात्र तरीही ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा लक्षवेधी कसा असु शकतो याचे उत्तम उदाहरण साडे हायस्कुल आहे.वेगवेगळया क्षेत्रामध्ये साडे हायस्कुल आपला ठसा कायम उमटवित वाटचाल चालु असुन गावचा रहिवाशी म्हणुन अत्यंत अभिमान वाटतो यावैळी मेघराज उद्योग समुहाचे हनुंमत पाटील निवृत बॅंक अधिकारी नारायण गावडे यांची भाषणे झाली.यावेळी जिल्हा क्रिडा संचालनालयाच्यावतीने ७ लाख रुपये किमतीचे व्यायाम साहित्य यावेळी माजी विद्यार्थी नारायण गावडे,आनंद गावडे यांनी गोरगरीब हूशार विदयार्थ्याना ७५ हजार रुपयाचे सायकल शालेय साहित्याचे वाटप केले यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष गोकुळराव पाटील सचिव देविदास ताकमोगे,संचालक डाॅ.वसंतराव पुंडे,मुख्याध्यापक प्रकाश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव देविदास ताकमोगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक सचिन गाडेकर यांनी केले तर आभार प्रविण आवटे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago