करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महेश चिवटे यांची शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले तेव्हापासून चमहेश चिवटे हे त्यांच्याबरोबर होते. शिवसेना उपप्रमुख असताना त्यांनी अतिशय ठामपणे ते भूमिका मांडत होते. त्यांनी नुकतीच करमाळा तालुक्यात कार्यकरणीही जाहिर केली होती. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच्या दुसऱ्यादिवशी चिवटे यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा एकनाथक शिंदे यांच्याशी थेट संपर्क आहे.
महेश चिवटे यांची शिंदे गटाचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती केली आहे. बुधवारी त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. माढा, करमाळा व माळशिरस या तालुक्यांमध्ये त्यांचे कार्यक्षेत्र असणार आहे. एक वर्षासाठी त्यांची ही निवड असणार आहे.शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत चिवटे हे उपजिल्हा प्रमुख होते. मात्र तेव्हाही ते मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक होते.
महेश चिवटे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते मानले जातात.त्याचे बंधु मंगेश चिवटे हे वैद्यकिय कक्षाचे प्रमुख मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांचे जेष्ठ बंधू् आहेत महेश चिवटे हे कमलादेवी औद्यागिक वसाहतीचे चेअरमन करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असुन यशस्वी उद्योजक असुन त्यांच्या निवडीचे स्वागत होत असुन त्यांचे सर्वच क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन होत आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…