कुगाव प्रतिनिधी लोकनेते माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नारायण आबा पाटील मित्र मंडळ आणि युवा नेते सागर पोरे यांच्या आव्हानाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला यामध्ये चिकलठाण १.२,केडगाव, दहिगाव ,जेऊर व कुगाव येथील महिलांनी सहभाग नोंदवला या शिबिराचे उद्घाटन युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्ता सरडे, उपसरपंच मन्सूर सय्यद, माजी सरपंच महादेव पोरे ,ग्रामपंचायत सदस्य अमोल अवघडे ,अशोक गाडे ,मारुती गावडे, तुकाराम हवालदार शिवाजी वायसे ,पांडुरंग काळे, बाबा सय्यद , रियाज शेख आदी उपस्थित होते या शिबिरात६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन उपसरपंच मन्सूर सय्यद यांनी आभार मानले. या शिबिरासाठी सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले .
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि आर्थिक प्रगतीचा वारसा जपत ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून…
करमाळा : प्रतिनिधी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव…
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…