करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र ड्रॅगन फ्रुट संघटनेची एकदिवसीय कार्यशाळा व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २०/८/२०२२ रोजी विटा जि. सांगली येथे मोहनराव कदम कृषी महाविद्यालयात मोठ्या दिमाखात पार पडला. त्यात पुर्ण महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुटची लागवड केलेले बहूसंख्य शेतकर्यासह आंध्र व कर्नाटकातील तज्ञ शेतकरी व शास्त्रज्ञही सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमामध्ये ईतर शेतकर्यांसोबत करमाळा तालूक्यातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमध्ये भरीव योगदान असलेले श्री. अनिल कलढोणे यांना सहकुटूंब पारितोषिक सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले. ड्रॅगन फ्रुट लागवडी बाबत विचारताना जैविक पद्धतीने झाडे व फळे जोपासल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर सगळीकडे ऊत्पादन वाढत असल्याने बाजारभावाविषयी चिंता वाटत असल्याने जून्यासह नविन शेतकर्यांनी ड्रॅगन फ्रुटच्या ईतर पर्यायी ऊत्पादनाकडे (By Products) वळावे असा सल्लाही दिला आहे. संघटनाही मार्केटींग व पर्यायी ऊत्पादनाविषयी वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गट शेती व सेंद्रिय शेतीकडे जाणीवपुर्वक लक्ष द्यावे कारण केंद्र शासन सेंद्रिय शेतीवर गंभीरपणे अभ्यासपुर्वक पावले टाकत असल्याचे सांगितले.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…