गावातील तंटे वाद मिटवून जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाचा फायदा होणार -आमदार संजयमामा शिंदे

करमाळा प्रतिनिधी
ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना गावठाणांची अचूक माहिती मिळणार आहे यामुळे अनेक गावातील तंटे वाद मिटवून जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाचा फायदा होणार असल्याचे मत करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले. ड्रोन सर्वेक्षणामुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वे होऊन प्रत्येक घराचा नकाशा, सीमा, क्षेत्र यांची अचूक माहिती मिळणार आहे. कर्ज उपलब्धता, विविध आवास योजनेस मंजुरीसाठी ,जागेचे मालकी हक्क दाखवण्यासाठी, मालमत्तेचा अधिकार पुरावा मिळकत पत्रिका स्वरूपात मिळण्यासाठी या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व गावातील जमिनींचे सर्वेक्षण आता ड्रोन द्वारे होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्री प्रकाश कांबळे यांनी दिली. आज 26 ऑगस्ट रोजी या योजनेचा शुभारंभ करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. देवीचा माळ नंतर उर्वरित सर्वच गावांचे मोजमाप ड्रोनद्वारे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित तहसीलदार समीर जी माने साहेब, गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब, भूमी अभिलेख वर्गाचा सर्व स्टाफ, मोटे मॅडम, कांबळे साहेब, ड्रोन कॅमेरा मन आनंद सागर ,उद्धव दादा माळी कंदर चे अमोल दादा भांगे, सरपंच महेश सोरटे उपसरपंच दीपक थोरबोले ग्राम पंचायत सदस्य संतोष पवार ,अमोल चव्हाण ,सचिन शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष सचिन शेठ चोरमुले,भाऊसाहेब जाधव साहेब ,ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीराम फलफले, माजी सरपंच दादासाहेब पुजारी ,माजी उपसरपंच नवनाथ दादा सोरटे ,प्रमोद गायकवाड,राजेंद्र सूर्यपुजारी, राजेंद्र पवार, सचिन चव्हाण, शेखर पवार, अक्षय सोरटे, लक्ष्मण हवलदार, कमला भवानी ट्रस्टचे विश्वस्त विवेक अण्णा येवले, पत्रकार जयंत दळवी व श्रीदेवीचा माळ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

23 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

4 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

4 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

5 days ago