*मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी*
*केशरी/पिवळे आदी रेशनकार्ड धारकांना मिळणार मोफत शस्त्रक्रिया योजनेचा लाभ*
*ठाणे महानगरपालिका , शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन.*
*ठाणे (प्रतिनिधी ): दि २६ ऑगस्ट २०२२* धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त , ठाणे महानगरपालिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , खा.डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सलग ३० दिवस मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाहित हृदयरोग संबंधी विविध मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
*हे सलग ३० दिवसीय महाआरोग्य शिबीर आज शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट २०२२ ते दि.२६ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज सकाळी १० ते संध्या ५ वा या वेळेत धर्मवीर आनंद दिघे साहेब हार्ट केअर सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा,ठाणे येथे सुरू राहणार आहे.*
तरी, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी ३० दिवस विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष , डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांनी केले आहे. वेळेअभावी नोंदणी न करू शकल्यास थेट शिबीर स्थळी केसपेपर काढून तपासणी करता येईल, अशी माहितीआयोजकांमार्फत देण्यात आली आहे.
*धर्मवीर आनंद दिघे साहेब हार्ट केअर सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा,ठाणे येथे होणार आहे.*
*संपर्क – ९९८७२२९९६०*
*अधिक माहितीसाठी*
*माऊली धुळगंडे*
*८९०७७७६००२*
*राम राऊत*
*८९०७७७६००४*
*सागर झाडे*
*८९०७७७६००६*
*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष* *कार्यालय*०२२-२५३२२५६७/२५*
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…