करमाळा: प्रतिनिधी
” अंजुमन तंबोलीयन जमातचे कार्य समाजाच्या प्रगतीसाठी असणार आहे” असे प्रतिपादन अंजुमन तंबोलीयन जमातचे राज्याध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले.अंजुमन तंबोलीयन जमात आणि हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केलेल्या दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच स्पर्धा परीक्षेत (Mpsc) यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा व हज बांधवांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बार्शीचे नगराध्यक्ष अॅड.असिफ तांबोळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेता रझा मुराद हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना शोएब यांनी “कुराण ए तिलावत” केली.
व्यासपीठावर पुणे ग्रामीण जमात चे अध्यक्ष अहमदभाई तांबोळी पेठवाले, नगरसेवक अल्ताफशेठ तंबोळी, पिं. चिंचवडचे माजी अध्यक्ष हाजी अब्बास भाई वाफगाव वाले, पिं. चिंचवडचे अध्यक्ष हाजी ताजुद्दीन तांबोळी, सांगली बिरादरी मुस्लिम जमातचे अध्यक्ष नगीब (जनाब) तांबोळी बिडीवाले, मुंबई तांबोळी जमातीचे माजी अध्यक्ष हनिफभाई तांबोळी, बिल्डर वजीरभाई तांबोळी, उद्योजक अर्षद शेठ तांबोळी, अझरशेठ तांबोळी, हाजी रज्जाकभाई सोडावाले, हाजी कुद्दुसभाई तांबोळी मनमाडवाले, सादिक तांबोळी(माजी नगराध्यक्ष, मनमाड), मजीद तांबोळी बारामती, गफ्फारभाई महाडकर, माजी प्राचार्य पापाभाई तांबोळी नांदगाववाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना हाजी उस्मान तांबोळी म्हणाले की, इतर मागासवर्गीय
(Obc) दाखले, जात पडताळणी साठी मार्गदर्शन, mpsc , upsc (स्पर्धा परीक्षा), मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, अल्पसंख्याकांच्या विविध शासकीय योजना समाजाच्या तळागाळात पोचवणे, शैक्षणिक शिबिर, पधेंगे तो बधेंगे, यशस्वी व्यावसायिकांचे मार्गदर्शन शिबीर, शासना वतीने दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सवलतीचे मार्गदर्शन अंजुमन तंबोलीयन जमातीचे अद्यावत कार्यालय मौलाना आझाद आर्थिक महामंडळा वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जा साठी प्रयत्न, महाराष्ट्र जमात एकत्र करणे जेणेकरून ज्यामुळे रिश्ते जमवणे आणि कौटुंबिक वादावर तोडगा काढणे यावर मजबुतीने काम करणे शक्य होईल असे हाजी तांबोळी यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र सोलापूर मिरज सांगली इस्लामपूर सातारा हा पट्टा तसेच मराठवाडा विदर्भ हे सर्व महाराराष्ट्रात येत असून ही मंडळी महाराष्ट्र जमाती पासून कोसो दूर आहेत, ह्या सर्व तांबोळी समाजातील बांधवांना अंजुमन तंबोलीयन जमात महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न करून तांबोळी समाजासाठी त अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे.असेही हाजी तांबोळी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सिने अभिनेता रझा मुराद म्हणाले की, समाजात यशस्वी होण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, तांबोळी समाजातील मुला मुलींनी शिक्षणासाठी पूढे आले पाहिजे, समाज शिक्षित असेल तर जागरूक असतो, हाजी उस्मानशेठ तांबोळी यांची समाजासाठी असणारी धडपड कौतुकास्पद आहे.
यावेळी सिने अभिनेते रझा मुराद यांचा सत्कार हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. अंजुमन तंबोलीयन जमातचे नूतन अध्यक्ष म्हणून हाजी उस्मानशेठ तंबोळी यांचा सत्कार सिने अभिनेते रझा मुराद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कॉमनवेल्थ जिम्नॅस्ट मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या सैफ सादिक तांबोळी मनमाड वाले यांचाही सत्कार रझा मुराद व अंजुमन तंबोलीयन जमात यांच्या वतीने करण्यात आला.
चौकट
यावेळी राज्याची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये
बिलाल तांबोळी यांची उपाध्यक्षपदी तर
युन्नूस तांबोळी (सर) यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी
अॅड. युन्नूस इस्माईल तांबोळी चिंचोली वाले यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
सिराज तांबोळी (घोस पुरीवाले),
रमजान तांबोळी- (बारामती) ,
अब्दूलरजाक इब्राहिम शेख यांची बिनविरोध सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रफिकभाई गफूरभाई चिंचोलीकर, जुबेर हाजी उमरभाई पाडलेकर, हाजी समीर अब्बासभाई यवतवाले, हाजी समीर अल्लाउद्दीन घोटावडेकर, इम्रान हाजी सिकंदरभाई संगमनेर वाले, नासिर सत्तरभाई सातारकर, वसीम जमिल भाई वाल्हे वाले, अबू अहमदभाई शिंपोरे वाले, हाजी जकीर हिराजीभाई राजेगाववाले, अरमान चिरागउद्दीन तांबोळी पिंपरी चिंचवड वाले, मोहसीनभाई तांबोळी बोपोडी वाले आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमरुद्दीन तांबोळी यांनी व आभार प्रदर्शन जुबेरभाई पाडलीकर यांनी केले.
चौकट
अंजुमन तंबोलीयन जमात चे कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरत असुन
अंजुमन तंबोलीयन जमातीची समाजासाठी असणारी धडपड पाहता ती नक्कीच यशस्वी ठरणार आहे.
….सिने अभिनेता रझा मुराद
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…