करमाळा प्रतिनिधी शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेले आरोग्य सेवेचे काम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री ना. अब्दुल सत्तार यांनी उपळी ( ता. सिल्लोड ) येथे आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले.*
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत फाउंडेशन आरोग्य सेवेच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपत असल्याची भावना मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ( दि.28 ) रोजी सिल्लोड तालुक्यातील उपळी येथे मोफत भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, समाजभान आणि लॉयन्स नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जवळपास 51 जणांनी रक्तदान केले तर शेकडो रुग्णाची या शिबिरात आरोग्य तपासणी करून त्यांना उपचार देण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सिल्लोड तालुकाप्रमुख सुनील पांढरे तसेच तालुका उपप्रमुख समाधान गायकवाड यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराचे उदघाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे होते. कार्यक्रमास शिवसेना मदत कक्षाचे मराठवाडा प्रमुख दादासाहेब थेटे, जिल्हा उपप्रमुख अमर लोखंडे, ज्ञानेश्वर गायके,चैतन्य देशमुख, ज्ञानेश्वर गायके, नितीन हिलाल , गोविंद कुमार, डॉ. मोहिज देशपांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, प.स. माजी उपसभापती अजीज बागवान, नॅशनल सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सतिष ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.कोरोना काळात मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सुविधांनी परिपूर्ण रुग्णवाहिका राज्यभर देण्यात आल्या. अनेक रुग्णांवर मोफत उपाचार व शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे प्राण वाचले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे असेल असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. रुग्णांना शासकीय योजनेसह सामाजिक क्षेत्रातून मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना मदत कक्ष काम करीत आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे तसेच खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रुग्णसेवेचे काम करीत असल्याचे मंगेश चिवटे म्हणाले.कार्यक्रमास म्हसला गावचे सरपंच सुखदेव सपकाळ, केरहाळाचे सरपंच दत्ता कुडके, रवी काळे, मुरलीधर शेजुळ, प्रदीप शेजुळ, राम कुटे, विठ्ठल गायकवाड, योगेश फोलाने, जनार्धन शेजुळ, राजेंद्र शेजुळ, राजीव सुरडकर, गणपत औटी, भगवान फोलाने, ऋषिकेश शेजुळ, बंडू काकरवाल, रामराव फोलाने, पप्पू शेजुळ, काशीनाथ सुरडकर, प्रदीप शेजुळ आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…