भिगवण प्रतिनिधी
स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ॲण्ड रिसर्च (फॉर गर्ल्स) या महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट तसेच दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, अनुसया इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी व दत्तकला ग्रुप ऑफ इन्टिटयुशन्स (सिव्हील इंजिनिअरींग) या महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडुन उत्कृष्ठ मानांकन प्राप्त झालेले आहे..राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचेकडुन नुकतेच महाराष्ट्रातील सर्व डिप्लोमा महाविद्यालयांचा शैक्षणिक तपासणी अहवालाचे मानांकन जाहिर झालेले आहे. दत्तकला शिक्षण संस्थेतील सर्व डिप्लोमा महाविद्यालये सातत्याने अवलंब करित असलेली नवीन शैक्षणिक ऑनलाईन प्रणाली, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, विद्याथ्र्यांचा उत्सफुर्त सहभाग तसेच सर्व शिक्षक कर्मचान्यांनी अवलंबलेली नवीन तांत्रिक शिक्षण पद्धत या सर्वामुळेच दत्तकला च्या सर्व डिप्लोमा महाविद्यालयांना सर्वोत्कृष्ठ मानांकन प्राप्त झालेले आहे अशी माहिती सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. आण्णासाहेब केस्ते, डॉ. सुनिल हरेर, प्रा. ज्योती जावळे, प्रा. अमित पोंदकुले यांनी दिली.
दत्तकला शिक्षण संस्था ही नेहमीच नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करण्यात अग्रेसर राहिलेली आहे त्यामुळे डिप्लोमा महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यानी केलेले यशस्वी प्रयत्न व सर्व विद्यार्थ्यांनी त्याला दिलेला उत्तम प्रतिसाद या सर्वामुळेच हे यश प्राप्त झालेले आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी केले.सर्व महविद्यालयांना सर्वोत्कृष्ठ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष श्री. राणा सुर्यवंशी, सचिव प्रा. माया झोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विशाल बाबर यांनी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…