केत्तूर ( अभय माने ) येथील नेताजी सुभाष विद्यालय व ज्युनिअर कॉलेज केत्तूर (ता.करमाळा) येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी विद्यालयामार्फत करमाळा पोलिसात तक्रार दाखल केल्याने करमाळा पोलीस ठाण्याकडील निर्भया पथकातील सदस्यांनी काल सोमवार (ता. 29) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास थेट कारवाई करीत शाळेच्या रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट तरुणांना पकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
गेल्या आठवड्यात सदर विद्यालयातील विद्यार्थिनीला अशा त्रासाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे शाळा प्रशासनाने रित्तसर करमाळा पोलिसाकडे तक्रार दिली, त्यानुसार सोमवारी करमाळा निर्भया पथक शाळेच्या परिसरात साध्या वेषात दाखल झाले. टोमणे मारणे, छेडछाड करणे अशा घटना शाळेपासून नेमक्या कोठे घडतात याची जाणीव असणाऱ्या निर्भया पथकाने तेथेच धाड टाकून काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन करमाळा पोलिसात हजर केले.दरम्यान विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना निर्भया पथकाची निर्मिती का झाली? याची माहिती विद्यार्थ्यांना देताना पोलीस कॉस्टेबल हेमंत पाडुळे म्हणाले की,” शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनी भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावे, कोणाच्यातरी दबावाला घाबरून कांही मुली स्वतःचे आयुष्य संपवतात. अशा मुलींनी न घाबरता निर्भया पथकाकडे दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी या पथकाचे स्वागत के.सी.जाधवर यांनी केले तर आर.डी.मधने यांनी आभार मानले. यावेळी निर्भया पथकातील पोलीस नाईक गणेश गायकवाड.पोलिस काॅन्स्टेबल संभाजी पवार उपस्थित होते. सदरच्या कारवाईसाठी करमाळा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी मार्गदर्शन केले.
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…