करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , करमाळा यांनी तालुक्यातील सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन सहाय्यक निबंधक मा. दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विजयश्री सभागृहामध्ये केली होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये संतोष गायकवाड प्रदेश सचिव सहकार भारती , चंद्रकांत धोंडे सहकार भारती सोलापूर जिल्हा संघटक , शिवानंद बोरामणी सचिव सहकार भारती जिल्हा सोलापूर हे उपस्थित होते. वरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी करमाळा तालुक्यातील सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना चंद्रकांत धोंडे यांनी सहकारी संस्थेचे महत्त्व सांगून त्यांच्या सुधारण्यासाठी काय-काय करणे गरजेचे आहे हे सांगितले. तसेच दिलीप तिजोरे यांनी आपल्या मनोगत आतून सहकारी पतसंस्था या अन्य सहकारी संस्थेने पेक्षा वेगळे आहेत. या वित्तीय संस्था असल्यामुळे पतसंस्थांनी आर्थिक शिस्त पाळणे गरजेचे आहे. ठेवीचा व्याजदर , कर्जाचा व्याजदर , आवश्यक गुंतवणूक , कर्जदाराच्या वसुलीचे व्यवस्थापन या सर्व बाबी पतसंस्थेचे चेअरमन , संचालक मंडळ याचे नियमित लक्ष असणे आवश्यक आहे. सहकारी पतसंस्थेच्या वेगळ्या गरजा आणि समस्या विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने 2017 साली सहकारी कायद्यामध्ये स्वतंत्र प्रकरण निर्माण केले आहे . यामध्ये सर्व सहकारी पतसंस्था जास्तीत जास्त व्याजदराच्या ठेवी स्वीकारू शकतील , तारणी व विनातारणी कर्जासाठी किती व्याजदर आकारता येईल. प्रत्येक संस्थेकडे किती राखीव रोखचा निधी आवश्यक राहील व वैधानिक रोखचा निधी किती राहील . या बाबी ठरवण्यासाठी मा. सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सहकारी नियामक मंडळाची रचना करण्यात आलेली आहे. या नियामक मंडळामध्ये काही पतसंस्थेच्या प्रतिनिधींचाही समावेश केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये नियामक मंडळांने ठेवीचा कमाल व्याजदर 10 % , तारणी कर्जाचा कमाल व्याजदर 14% व विनाकारणी कर्जाचा कमाल व्याजदर 16 % , राखीव रोखचा निधी मागील तिमाहीच्या एकूण ठेवीच्या 1 % वैधानिक तरलता निधी मागील तिमाहीच्या 25 % ठेवण्याबाबत निर्देश दिले आहेत. या तरतुदीचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कार्यवाही करण्याबाबत या प्रकरणात तरतुदी नमूद केल्या आहेत. सर्व सहकारी पतसंस्थांनी नियामक मंडळाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले .
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विलासरावजी घुमरे सर यांनी सहकारी संस्थांच्या निकोप वाढीसाठी संस्थेचे नियोजन सुयोग्य असणे कसे गरजेचे आहे. सहकारी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत भोंग यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.एम.डी. जाधव यांनी केले. तर आभार श्री. आदिनाथ देवकते यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. बेंढारी साहेब , श्री. अशोक नरसाळे , श्री. उदय सुरवसे , श्री. अमोल बागडे , श्री.संजय ठेंगडे ,श्री. संतोष कुलकर्णी , श्री. गणेश वळेकर व त्यांच्या सहकार्यांनी योग्य ते सहकार्य केले .
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…