*ना.चंद्रकांतदादांनी जागविल्या विद्यार्थी चळवळीतील आठवणी..* *सोलापूर जिल्ह्यातील डिजिटल मिडियाने केले चंद्रकांतदादांचे मनःपूर्वक स्वागत*

 

सोलापुर प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सक्रीय चळवळीतून राजकारणात आलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सोलापूर शहर व जिल्हा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रथम आगमनानिमित्त काल मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थी चळवळीत राज्यातील अनेक विद्यापीठांच्या प्रवेशद्वारावर त्यांनी केलेल्या आंदोलन-उपक्रमांची आठवण त्यांना झाली.त्या आठवणी जागवताना त्यांनी नव्याने जबाबदारी घेतलेल्या खात्याच्या माध्यमातून बेरोजगारीवर परिणामकारक उपाय ठरणारे आणि महाराष्ट्रात नवे लघुउद्योजक व व्यावसायिक घडविणारे कौशल्य विकास अभ्यासक्रम विकसित करणार असल्याचेही आवर्जून सांगितले.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत, शहर अध्यक्ष प्रशांत कटारे तसेच भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार,राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व भाजप युवा नेते मोहन डांगरे यांच्या हस्ते चंद्रकांतदादांना श्री.विठ्ठल-रुक्मिणींची मूर्ती, तुळशीहार देवून स्वागत व सत्कार करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी संघटनेच्या वाटचाल व उद्दिष्टांची माहिती दिली.यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत माने उपस्थित होते.
या स्वागत उपक्रमाचे संयोजक राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी,सहकोषाध्यक्ष मुरलीधर चव्हाण,अमित इंगोले,रोहण नलावडे, जिल्हा सहसचिव विनोद ननवरे,शहर अध्यक्ष प्रशांत कटारे, सचिव रामकृष्ण लांबतुरे, कार्याध्यक्ष परशुराम कोकणे, उपाध्यक्ष अभिषेक आदेप्पा, खजिनदार विकास कस्तुरे, बार्शी तालुका अध्यक्ष टिंकू ऊर्फ अजय पाटील, सोलापूर शहर, कार्यकारणी सदस्य मनोज भालेराव, सचिन जाधव, योगेश कल्याणकर मोहसिन मुलानी, सिद्धेश्वर माने, दादासाहेब कोडग,दिनेश मडके, हर्षल गाडे आदी जिल्ह्यांतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. *-राजा माने,* अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago