प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजना अंतर्गत कार्यशाळा संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी.प्रा.मनोज बोबडे  केन्द्र शासन प्रणित, आत्मनिर्भर भारत अंतर्गत, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना येत्या पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतमाल प्रक्रिया आणि कृषी पूरक व्यवसाय यांचेसाठी ही योजना आणली आहे. या योजनेत करमाळा तालुक्यातील अधिकाधिक शेतकरी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन *तालुका कृषी अधिकारी करमाळा, श्री संजय वाकडे* यांनी केले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करमाळा यांच्यावतीने लाभार्थी अर्ज सादरीकरण भव्य अशी कार्यशाळ आयोजित केली होती, या कार्यक्रमाला 162 महीला बचतगट ,कृषी विभागातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थी व गट लाभार्थी जसे शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसाह्यता गट व उत्पादक सहकारी संस्था यांना लाभ देय आहे. योजनेतून शेतीमालाचे मूल्यवर्धन, पुरवठा साखळींशी जोडणी व त्याद्वारे संबंधितांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.  योजना बँक कर्जाशी निगडित असून, वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणुकीकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के व कमाल १० लाख मर्यादित व गट लाभार्थ्यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणुकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान देय आहे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
नवीन प्रक्रिया उद्योग उभारल्यास या योजनेतून अनुदान मिळते. ज्वारी व्यतिरिक्त इतर कार्यरत प्रक्रिया उद्योग असेल तर त्याच्या विस्तारीकरण, स्तरवृध्दी,आणि आधुनिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. वैयक्तिक लाभार्थी ,गट संस्था, सहाय्यता गट ,शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था उत्पादक ,सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.”
या योजने सबंधी अर्ज करण्या साठी श्री मनोज म.बोबडे
यांच्या शी संपर्क साधावा *9881651012* किंवा कृषी विभाग करमाळा सर्व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा.

*श्री समाधान खूपसे पाटील* प्रशिक्षण समन्वयक (PMFME) राज्य स्तरिय तांत्रिक संस्था कृषी विज्ञान केंद्र, बारामती ————————
—————————————-
‼️ *एक जिल्हा एक उत्पादनामध्ये केला बद्दल
*
▪️पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादनअंतर्गत जिल्ह्यात ज्वारीजन्य पदार्थाच्या प्रक्रिया उद्योगासाठी बॅंकांकडून भांडवल देण्यात येते.
▪️ मात्र आता योजनेचे निकर्ष बदलेले असल्याने कोणत्याही जिल्ह्यात कोणतेही फळ किंवा अन्नधान्य पदार्थापासून उत्पादने तयार करण्यात येतील त्यासाठी भांडवल मिळणार आहे
▪️ यामध्ये ज्वारीजन्य पदार्थ सागरी उत्पादने नाचणी भगर चिकू, आंबा ,केळी ,कांदा, टोमॅटो, दूध, गहू , द्राक्ष ,गुळ, मका, मोसंबी, सीताफळ, पेरू, हरभरा, तूर, मूग, हळद, मिरची ,संत्रा, सोयाबीन, जवस, भात, आधीचा या प्रक्रिया उद्योगामध्येे सामावेश असल्याचे सांगण्यात आले आहे
▪️▪️ प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन ही कृषी प्रक्रिया उद्योगाबाबतची एक चांगली योजना आहे.शेतकरी किंवा शेतकरी गट एकत्र येऊन शेतमालावर वर प्रक्रिया करणारा
उद्योग उभारू शकता.त्यातून शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल .त्यामुळे या योजनेचा युवकांनी व महिलांनी त्या प्रमाणात लाभ घ्यावा
▪️ यामध्ये उद्योगाला 35% सबसिडीची तरतूद कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे
▪️ *श्री मनोज म.बोबडे*
जिल्हा समन्वयक तथा
जिल्हा संसाधन व्यक्ती( PMFME)
कृषी विभाग करमाळा‼️
—————————————-
तसेच या महिला मेळावात तालुका कृषी अधिकारी श्री संजय वाकडे साहेब, श्री देवराव चव्हाण कृषी अधिकार, श्री मनोज म. बोबडे जिल्हा समन्वयक तथा
जिल्हा संसाधन व्यक्ती ( PMFME) ,श्री डी.एस. चौधरी मंडळ कृषी अधिकारी, श्री योगेश जगताप(उमेद), श्री अजय बागल साहेब ( आत्मा)श्री उमाकांत जाधव साहेब , श्री. अविनाश शिंदे (केंद्र व्यवस्थापक, मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र, करमाळा) इतर कर्मचारी, उद्योजक शेतकरी उपस्थित होते, यावेळी योजनेतील लाभार्थी चे अर्ज सादरीकरण, त्रुटी पूर्तता, प्रकल्प अहवाल, योजनेचा व्याप्ती यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री. मनोज बोबडे यांनी मानले. उमेद भवन सभागृह करमाळा येथे पार पडला.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago