आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातुन दहीगाव उपसा सिंचन योजना ही आमच्या पूर्व भागाला वरदान देणारी-रविंद्र वळेकर

करमाळा प्रतिनिधी
आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार दहिगाव उपसा सिंचन योजनेची आवर्तने नियमित सुरू असून त्यामुळे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचा कायापालट झाला आहे .दहीगाव उपसा सिंचन योजना ही आमच्या पूर्व भागाला वरदान ठरली आहे असे मत करमाळा तालुका राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर यांनी व्यक्त केले. निंभोरे येथील फुटतळे तलावाच्या पाणी पूजन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत चार वेळेस या तलावाचा सांडवा दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून निघाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार शिंदे यांच्या या कामामुळे फूटतळे व परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे.
यावेळी सौ.प्रभावती वळेकर, सौ.शोभा वळेकर, सौ.सुमन दळवी, सौ.सारिका वळेकर, सौ.रामकवर दळवी, जयश्री दळवी, मंगल दळवी, शितल दळवी,परुबाई वळेकर, पूनम वळेकर यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्या कामी योगदान दिल्याबद्दल दहिगाव योजनेचे शाखा अभियंता सोहम कांबळे साहेब आणि चालक अमोल कोकणे, राष्ट्रवादी पदवीधर चे करमाळा तालुका अध्यक्ष राविदादा वळेकर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शुभाष वळेकर , तुळशीराम वळेकर, राजेंद्र वळेकर, सोमनाथ वळेकर, बाळू फरतडे, किसन वळेकर,अशोक वळेकर,हरिभाऊ वळेकर, लिंबाजी वळेकर, भैरू वळेकर,संतोष वळेकर, ज्ञानदेव वळेकर,आदित्य वळेकर, विठ्ठल वरकड (सर), अभिमान दळवी, विकास दळवी, रमेश दळवी, ज्ञानेश्वर वळेकर, गणेश वळेकर आदि उपस्थित होते.
निंभोरे गावाच्या चारी बाजूने चार तळी आहेत.विठोबाचे तळे,आंब्याचा मळा येथील फरतडे वस्ती तळे,फूट तळे आणि एकवीरा आई चे तळे. त्यापैकी चालू अवर्तनाला विठोबा तळे, आंब्याचा मळा येथील तळे आणि फूट तळे भरून सांडवा निघाला आहे. तसेच एकवीरा आई चे तळे हे 10 नंबर चारी वर येते. चारीचे काम पूर्ण करून ते तळे देखील भरण्याचा आमचा मानस आहे. आमदार संजय मामा शिंदे यांच्या सहकार्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आत्ता पर्यंत विठोबा तळे 3 वेळा, फूट तळे 4 वेळा आणि आंब्याचा मळा येथील फरतडे येथील वस्ती वरील तळ्याचा 2 वेळा सांडवा निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. सर्व शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत. येथून पुढे देखील अशीच योजना चालवली जाईल व शेतकरी बांधवांचे हित साधले जाईल यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत…रविंद्र वळेकर (निंभोरे)

saptahikpawanputra

Recent Posts

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

6 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

12 hours ago

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार! ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत अक्षय पिट्टा, श्वेता विडप व गंधम तुलसी यांचा सहभाग

करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…

1 day ago

करमाळा तालुक्यात शेतीपंपांची वीज कपात म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रकार शंभूराजे जयवंतराव जगताप यांचा इशारा ​

​करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…

1 day ago

बैलपोळ्यानिमित्त गोसेवेचा जागर; ९० गोमातांच्या सान्निध्यात भक्तिमय सोहळा गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्थेत पुरणपोळीचा नैवेद्य, विधिवत गोपूजन अन् गोसेवेचा संदेश

करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…

2 days ago