केत्तूर (अभय माने ) गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आज केत्तूर (ता. करमाळा) व परिसरातील सार्वजनिक, बाल गणेश तसेच घरगुती गणेश भक्तांनी गणरायाचे उत्साहात आगमन केले. गेल्या दोन वर्षापासून असलेली कोरोनाची लाट ओसरल्याने व यंदा सर्व निर्बंध क्षिथिल करण्यात आल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात व जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
आले रे आले गणपती बाप्पा आले… चा जयघोष करीत आज दुपारी दोन वाजेपर्यंत गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी शुभ मुहूर्त असल्याने गणेश भक्तांची गणेश मूर्ती नेण्यासाठी लगबग दिसून येत होती परिसरात यावर्षी बाल गणेश मंडळांची संख्या वाढली आहे त्यांचा आनंद व उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर यावर्षी गणेश मूर्ती ही अनेक व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या एवढ्या मूर्ती पाहून त्या शिल्लक राहतील असा अंदाज होता परंतु सर्व विक्रेत्यांकडे गणेशमूर्ती सायंकाळपर्यंत संपल्या होत्या.विक्रेत्यापासून सर्वांनीच डॉल्बी ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची करीत गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत होत्या.यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…