श्री कमलाभवानी ब्लड बँकेची सुरुवात करमाळा तालुक्यासह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरात श्री कमला भवानी ब्लड बँकेची सुरुवात या ब्लड बँकेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा करमाळा प्रतिनिधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने करमाळ्यात श्री कमला भवानी ब्लड बँकेची सुरुवात झाली असून या ब्लड बँकेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात सह परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद कमलाभवानी ब्लड बँकेचे कार्यकारी संचालक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे व संचालक दीपक पाटणे यांनी व्यक्त केला आहे.
करमाळा येथील देवीचा माळ रोडवरील अमरनाथ टावर मध्ये स्वातंत्रसैनिक कै. मनोहरपंत गणपत चिवटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या समन्वयातून ही ब्लड बँक सुरू करण्यात आली आहे.या ब्लड बँकेच्या माध्यमातून करमाळा तालुका व परिसरात रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार असून यामध्ये विविध सामाजिक संघटना गणेशोत्सव मंडळ विविध नेते मंडळींची वाढदिवस यानिमित्ताने रक्तदान शिबिरे घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी ब्लड बँकेची संपर्क साधावा असे आव्हान या ब्लड बँकेचे व्यवस्थापक निलेश पाटील यांनी केले आहे.
जे रक्तदाते असतील किंवा जे रक्तदान शिबिर घेतील अशा मंडळांना मोफत व सवलतीच्या दरात रक्त देण्यात येणार आहे.या ब्लड बँकेसाठी डॉक्टर कोमल सोरटे, प्रशांत भोसले, प्रशांत विधाते, साधू जगताप, ओंकार मिरगे आधी तज्ञ आपली सेवा देत आहेत.
आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत व सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत लवकरच या ब्लड बँकेचे लोकार्पण सोहळा होणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करमाळ्यात डायलिसिस सेंटरची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक दीपक पाटणे यांनी दिली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago

निमगाव (ह )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्पदरात चष्म्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…

4 days ago