सर्वसामान्य नागरिकांचे कामे करा अन्यथा तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय सोडणार नाही- खा.रणजितसिंह नाईकनिंबाळकर

करमाळा प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी नागरिकांना सेवा देऊन त्यांचे प्रश्न सोडवुन सहकार्य करावे अन्यथा आपण त्यांना कार्यक्रम केल्याशिवाय सोडणार नाही असे प्रतिपादन खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. करमाळा येथे माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये गुरूवारी प्रशासकीय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते पंचायत समिती सभागृहात ही बैठक संपन्न झाली, यावेळी तहसीलदार समीर माने ,पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजावटे, गटविकास अधिकारी मनोज राऊत भाजपाचे तालुकाअध्यक्ष गणेश‌ चिवटे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भाजपाची जिल्हा चिटणीस सरचिटणीस किरण बोकन शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे भाजपाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे युवा नेते शंभूराजे जगताप सरपंचडॉक्टर अमोल घाडगे हरिदास डांगे डॉक्टर वसंतराव पुंडे दत्तात्रय जाधव काकासाहेब सरडे उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी जातेगाव टेंभुर्णी रस्त्याचे कामाबाबत प्रश्न उपस्थित केला याला उत्तर देताना खासदार नाईक निंबाळकर म्हणाले की करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी जातेगाव रस्त्याच्या कामाबाबत लवकरच बैठक लावून मार्ग काढला जाईल असे सांगितले असुन प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था जेऊर रेल्वे स्थानकाची समस्या हुतात्मा एक्सप्रेस थांबाचा प्रश्न महसूल विभागा विभागाच्या अडचणी त्या त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ सोडावाव्यात खासदार रणजीतसिंह नाईकनिंबाळकर यांनी अधिकाऱ्याची कान उघडणी करत तुम्ही जर नीट काम केले नाही तर मी तुमचा कार्यक्रम करेल असा इशाराही दिला पांडे येथील शिक्षकाबाबत बळीराजा संघटनेच्या उपाध्यक्ष अनिल तेली केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दोन शिक्षकाचे निलंब तात्काळ करण्याचे आदेश त्यांनी दिले प्रधानमंत्री किसान योजना रेशन रेशन कार्ड योजनेबाबत माहिती त्यांनी दिली असून 90 लाभार्थ्यांनी रेशन हक्क सोडला असून त्याचा लवकरच सर्वेक्षण करण्यात येईल असे ही तहसीलदार समीर माने यांनी सांगितले यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे प्रवासी संघटनेचे सुहास सूर्यवंशी दादा थोरात भाजपचे लक्ष्मण केकान, बळीराजा संघटनेचे आण्णा सुपनवर अनिल तेली फिसरेचे उपसरपंच संदीप नेटके पत्रकार अशोक मुरूमकर यांनी समस्या मांडल्या असून या सर्व समस्याचे लवकरच निराकरण करण्यात येईल असे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

19 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago