करमाळा प्रतिनिधी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे वांगी परिसरातील नागरिकांनी रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली असता येत्या एक महिन्यात राज्य अथवा केंद्र सरकार कडून निश्चित निधी उपलब्ध करून उजनी ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला त्याना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वांगी नं 1 काल दि . 2 रोजी दोन दिवसीय करमाळा दोर्याच्या समारोप प्रसंगी वांगी नं 1 येथे दिले . खा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी वांगी पंचक्रोशीतील वांगी 1, 2,3,4,ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी, नरसोबावाडी या गावातील धरणग्रस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वांगी नं 1येथील राम मंदिरात आयोजित केलेल्या या बैठकीचे प्रास्ताविक करताना करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांनी वांगी परिसर हा उजनी धरणामुळे पुनर्वसीत झालेला असून नागरी सुविधा साठी हा परिसर पंचेचाळीस वर्षे झाली तरी अध्याप संघर्ष करीत असल्याचे सांगितले. धरणग्रस्तांना अग्रहक्काने देय असलेल्या नागरी सुविधा पैकी मजबूत पोहोच रस्ते अध्याप ही मिळाले नसल्याचे नमूद केले . शेलगाव ते ढोकरी दरम्यान वांगी नं 3 येथील स्थानिक अडथळा दूर झाला असल्याने ठप्प झालेली दैनंदिन वाहतूक सुरळीत करण्या साठी सातशे मीटर अंतराकरिता तात्काळ निधीची उपलब्धता करून ध्यावी तसेच वांगी नं 1 ते पांगरे या अत्यंत खराब रस्त्याला पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तात्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळावी अशीही प्रा बंडगर यानी केली.
आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख यानी ही या दोन्ही रस्त्याला तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत महिन्या भरात ही कामे सुरू व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली .
महेंद्र पाटील, नितीन तकीक यानी ही या दोन्ही मागण्यासह वांगी दोन ते शेलगाव या खराब रस्त्याला निधी ची मागणी केली.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे बोलताना म्हणाले की संपूर्ण करमाळा तालुक्यातील अनेक रस्ते प्रचंड नादुरुस्त असून एक स्वतंत्र बजेटच या तालक्यातील रस्त्यासाठी मंजूर करावे लागेल . उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांचा त्याग मोठा असून या भागातील पदाधिकारी यानी मागणी केलेल्या रस्त्यासाठी केंद्र अथवा राज्य सरकार यांच्याकडील संबंधित खात्याकडून निधी उपलब्ध करून एक महिन्यानंतर होणार्या माझ्या पुढील दोर्यात नारळ फोडून कामाची सुरूवात करण्याचा प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
या दोर्यात खा. निंबाळकर यांच्या बरोबर तालुकाअध्यक्ष गणेश चिवटे,शंभूराजे जगताप, बी पी रोंगे ,सोलापूर जि प चे माजी सभापती शिवाजी राजे कांबळे, भाजप उपाध्यक्ष किरण बोकन,करमाळा शहर भाजपा अध्यक्ष जगदीश अग्रवाल,अमरजित साळुंके ,विलास लबडे ,भूषण लुंकड, रा मा ढाणे ,लक्ष्मण केकान , आदिनाथ चे माजी संचालक भारत साळुंके, दत्ता बापू देशमुख, संजू देशमुख, विठ्ठल शेळके,संजय कदम,अर्जुन आबा तकीक,तानाजी देशमुख, डाॅ भाऊसाहेब शेळके, अमर आरकिले, दत्ता आरकिले ,सुशांत आरकिले,देवा पाटील ,सुनील सांगवे , राऊ काका देशमुख, अनिल बोरकर, बाबासाहेब चौगुले,अवि देशमुख, धनंजय गायकवाड, महादेव चौधरी, विशाल तकीक, रामेश्वर तळेकर, व पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वांगी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा असण्यार्या शेलगाव ते ढोकरी या रस्त्यावरील वांगी नं 3 येथील अपूर्ण बाह्यवळण 700 मीटरच्या रस्त्याला निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे तसेच वांगी 1 ते पांगरे रस्त्याला तात्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळावी या मागणीचे निवेदन वांगी परिसरातील नागरिकांच्या वतीने आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याना वांगी दोर्यात देण्यात आले .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…