सुर्यकांत होनप करमाळा प्रतिनिधी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अंतर्गत आडसूळ शैक्षणिक संकुलाचा ११ वा वर्धापन दिन रविवार २८ ऑगस्ट २०२२ रोजी चास येथे संपन्न झाला. त्या दिनाचे औचित्य साधून संकुलातर्फे अहोरात्र जनतेची सेवा करणारे व अहोरात्र राजकीय, आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटनांचे मुद्देसूद माहिती देणाऱ्या व सामाजिक बांधीलकी निर्माण करणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.अनिरुद्धजी आडसूळ, उपाध्यक्ष मा.विश्वनाथजी आडसूळ, प्राचार्य डॉ.प्रदीप.एम.पाटील व प्रमुख अतिथी मा. दत्ताभाऊ पाचपुते, रमेश जेठे, संजय वायकर व्यासपीठावर होते.
प्राचार्य डॉ.पाटील सर यांनी मागील ११ वर्षाचा आडसूळ शैक्षणिक संकुलाचा प्रवास प्रस्तावा मध्ये मांडतांना संस्थेमध्ये चालणाऱ्या दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे विविध स्किल डेव्हलपमेंट करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच भविष्यामध्ये शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे व ८०% विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे, १५% विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेऊन सरकारी नोकरीत किंवा हायर एजुकेशनला जाण्यासाठी व ५% विद्यार्थ्यांना उद्योजक बनवण्याचे आश्वासन दिले.
पुढे ते म्हणाले कि विविध प्लेसमेंट मेडिकल कॉलेज चे सर्व कोर्सेस आम्ही चालू करणार असुन महाराष्ट्रातील सर्वच तरुणांसाठी प्लेसमेंटची सुविधा करणार आले. थोड्याच दिवसा पूर्वी आडसूळ शैक्षणिक संकूला मार्फत केलेल्या प्लेसमेंट मधे ४७८ तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. यावेळी जवळपास ५८ कंपन्यांनी यात सहभाग नोंदविला होता. या संकुला मार्फत भविष्यात साडेचार रुपयांच्या केसपेपरवर सर्व वैद्यकिय सुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले .
यावेळी प्रमुख अतिथी मा.
दत्ताभाऊ पाचपुते म्हणाले कि आडसूळ शैक्षणिक संकुलाचा हा गोड कार्यक्रम कौतुकास्पद आहे तसेच भविष्यात सर्व पत्रकार बंधूनी आडसूळ शी संलग्नित राहण्याची ग्वाही दिली. मा. रमेश जेठे यांनी अडसुळ शैक्षणिक संकुलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले व पत्रकारांचा सत्कार सन्मान केल्या बद्दल आभार व्यक्त केले .मा. संजय वायकर यांनी अडसुळ शैक्षणिक संकूलाने ११ व्या वर्धापन दिना निमित्त पत्रकार मेळावा घेवुन सर्व पत्रकारांचा सत्कार केल्या बद्दल आभार व्यक्त केले. या संकुलातील सुहास पाखरे सर यांचे पत्रकारांशी घट्ट नाते असुन त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क खुप दांडगा असल्याने अडसुळ शैक्षणिक संकुल भविष्यात खुप मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात मा.प्रा.अनिरुद्धजी आडसूळ म्हणाले कि आडसूळ चे एक रोपटे २०११ मध्ये लावले होते आज ११ वर्ष संपूर्ण होत असताना वटवृक्ष होताना मला आनंद होत आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा माझा मानस आहे. यासाठी सर्व कर्मचारी याठिकाणी कार्य करीत असतात तसेच पत्रकार बंधूना भविष्यात संस्थेशी संलग्नित राहण्याची विनंती केली. ह्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध दैनिकांचे संपादक व पत्रकार बंधू उपस्थित होते .
यावेळी पत्रकार जयंत कुलकर्णी , प्रतिक एकशिंगे, साबिल सय्यद, साहील सय्यद, रफीक शेख, निरज चांगटे, सचिन गांधी, विनायक गुरसाळी, गणेश मराठे, सूर्यकांत होनप, अंकुश शिंदे, पिटर रणसिंग , गोरक्षनाथ बांदल, एस. यु .गायकवाड, रामचंद्र मंजुळे, देवीदास आंधळे, दौलत झावरे आदि पत्रकार उपस्थित होते.
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन एम.बी.ए विभागप्रमुख प्रा.सुहास पाखरे यांनी केले. प्राचार्य डॉ.प्रदीप.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. किशोर जाधव, प्रा.रमेश गडाख, डॉ. साजीद खान, डॉ. दिनेश अडोकर, डॉ.हेमंत जाधव, डॉ.जैन ज्ञानकुमार, डॉ.विश्वजित कांबळे, प्रा.अभिषेक जवरे, प्रा.स्नेहिल गायकवाड, प्रा.प्रदीप गवळे, प्रा.गजानन नाईक, प्रा.सुनील कुमार आदींनी अतोनात प्रयत्न केले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…