करमाळा प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडी दिवशी झालेल्या वादावादी तून दाखल गुन्ह्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामकाजात अडथळा आदी आरोपातून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह सातजणांना बार्शी येथील सत्र न्यायाधीश जे. सी .जगदाळे यांनी दोषमुक्त केले .करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवडी दिवशी झालेल्या वादावादी तुन दिग्विजय बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप, भाजपचे युवानेते शंभुराजे जगताप, सचिन चांदगुडे, जयराज चिवटे, शिवराज चिवटे, विकास फंड यांचेविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामकाजात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता . या घटनेमुळे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजीक वातावरण कलुषित झाले होते . माजी आमदार जगताप यांना जामीनाला झालेला विलंब, एकुलत्या एक मुलीचे लग्नात आलेले अडथळे या सर्व बाबींचा अत्यंत दूरगामी प्रतिकूल परिणाम झाले, विधानसभा निवडणुक निकालातही याचे प्रतिबिंब दिसून आले . माजी आमदार जगताप पोलिसात हजर राहतेवेळी त्यांचे समर्थनार्थ करमाळा शहर व परिसरात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता .दरम्यान पोलिसांनी सदर प्रकरणी बार्शी येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते . त्यामधे अर्जदारांनी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. कमलाकर वीर यांचे मार्फत दोषमुक्त करण्याचा अर्ज दाखल केला होता . अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड .थोबडे यांनी आपले युक्तिवादात जीवे ठार मारणेबाबत व सरकारी कामकाजात अडथळा आणले बाबतचे कलम लागू होत नसलेबाबत युक्तिवाद करीत त्याच्या पृष्ठयार्थ उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले . ते ग्राह्य धरून बार्शी येथील सत्र न्यायाधीश जे. सी . जगदाळे यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ( ३०७ ) व सरकारी कामकाजात अडथळा आणण्याचे (३५३ ) कलमातून आरोपींची दोषमुक्तता केली व इतर कलमान्वये चार्ज फ्रेम करण्याचे व सदरचा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी करमाळा यांचे समोर चालविणे साठी वर्ग करण्याचे आदेश दिले . यात अर्जदारांतर्फे ॲड .मिलिंद थोबडे, ॲड .कमलाकर वीर, ॲड. निखिल पाटील, ॲड .अभिजीत इटकर, ॲड .महेश जाधव यांनी तर सरकार तर्फे विशेष सरकारी वकील ॲड .राज पाटील यांनी काम पाहीले .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…