केत्तूर ( अभय माने) गणपती बाप्पा पाठोपाठ गौरीचेही मोठ्या आनंदात व उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी महिला मंडळीसह बच्चेकंपनीचा आनंद ओसंडून वाहत होता.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला राज्यात व देशात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते.चतुर्थीनंतर गणेशाची बहिण ज्येष्ठ व कनिष्ठ। म्हणजेच गौरी तिचेही आगमण शनिवार (ता.3) झाले.गौरी आगमनाचा मुहूर्त शनिवार (ता. 3 ) रात्री 10.56 मिनिटापर्यंत असल्याने सायंकाळनंतर घरोघरी गौरीचे आगमन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. गौरी हा सण तीन दिवसांचा असतो तो घरोघरी उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो पहिल्या दिवशी गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीचे भोजन तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते.
गौरी गणपती हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या पारंपारिक व धार्मिक पद्धतीने साजरा होतो परंतु यावर्षी या सणाला महागाईचे ग्रहण लागले आहे. सजावटीचे तसेच इलेक्ट्रिक साहित्य मोठ्या प्रमाणात महाग असल्याने अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून आले.
मिठाईला मागणी —
गौरी सणासाठी घरी मिठाई करण्यापेक्षा रेडिमेड मिठाई आणण्यावर भर देण्यात आला असल्याचे दिसून आले. यामध्ये लाडू, जिलेबी, मैसूरपाक, बालुशाही, करंजी,फरसाण आदी महत्त्वाच्या पदार्थांना मागणी होती.
पूजा साहित्याचे दरही वधारले —
फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे .पूजा साहित्याचे दर 15 ते 20 टक्केनी वाढले आहेत त्यासोबतच गुलाल, खडीसाखर, खोबरे, खोबराकीस, खारीक, बदाम, लाल सुपारी, हळदीकुंकू, रांगोळी भ आदिंच्या दारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…