केत्तुर नं.२ पारेवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट कायमचे बंद करण्यात आलेले आहे.. आणि रेल्वे विभागाने पर्यायी मार्ग म्हणुन बोगद्याची वाहतुक चालु केली आहे.. बोगदा झाला परंतु त्या ठिकाणचे रस्ते आणि पाणी वाहुन जाण्यासाठीचे गटार यांचे काम अद्यापही अपुर्ण आवस्थेत असुन, याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अजुनही रेल्वे प्रशासन ढिम्मच आहे.. येथिल कॉन्ट्रक्टर रेल्वे ने आमची बिले दिली नाहीत याचे कारण पुढे करून चालढकल करीत असुन, रेल्वे प्रशासनाचे संबधित अधिकारी तात्पुरती मलमपट्टी करतात आणि निघुन जातात परंतु हे काम ज्या वेळेत पुर्ण होणे गरजेचे होते त्या वेळेत झालेले नसुन रेल्वे प्रशासनाने बोगद्याचे व रस्त्याचे पुर्ण काम होणे पुर्वीच रेल्वे गेट बंद केल्यामुळे येथिल नागरिकांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागतोय.. याबाबत येथिल सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित विघ्ने, लक्ष्मीकांत पाटील, महादेव नगरे, व ग्रामस्थांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन दिले असुन, काल परवाच या विभागाचे खासदार रणजितसिंह नाइक निंबाळकर यांनाही यानाही याबाबत सांगितले होते परंतु रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार आपल्याच धुंदीत असुन यामुळे जर प्रवाशांचे व नागरिकांचे काही नुकसान झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असे वक्तव्य येथील नागरिक करित आहेत.. रेल्वेचे दुहेरीकरण चालु आहे ही बाब चांगली आहे, परंतु या ठिकाणी स्थानिक नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आता बोंबला म्हणण्याची वेळ आली आहे.. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणचे काम आता तातडीने न केल्यास लवकरच लाक्षणिक बोंबाबोंब आंदोलन केले जाईल अशी माहिती ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…