केत्तूर ( अभय माने) – गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पीक पाणी नोंदण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. ऑनलाइन पीक पाणी नोंदणी करून, उताऱ्यावरील पीक पाणी नोंदीच्या आधारे वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा उपयोग होतो. मात्र गेल्या दहा दिवसांहून अधिक काळापासून तालुक्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.केत्तूर येथील उपसरपंच प्रशांत नवले म्हणाले, आम्ही गेल्या चार-पाच दिवसांपासून ऑनलाईन पीक पाणी नोंदण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने आमचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. परिणामी पीक कर्ज घेण्यास अडचण आली आहे. अशी परिस्थिती बहुतांश शेतकऱ्यांची असून यावर करमाळा तालुक्यात ऑनलाईन पिक पाहणीचे पिक पाहणीचे सर्व्हर डाऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान येथील गाव कामगार तलाठी माने यांना विचारले असता, सर्व्हर डाऊनच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या अपडेट करण्याचे काम सुरू असल्याने ही समस्या निर्माण झाली असून, येत्या दोन-तीन दिवसात परिस्थिती सुधारेल असे त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…