मुंबई प्रतिनिधी. शिवसेना भवन, काँग्रेस भवन, राष्ट्रवादी भवन, भाजप कार्यालय अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला आप-आपले भवन आहे. दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रातील जनतेसाठी महाराष्ट्र भवन आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी विविध कामासाठी नेहमीच राजधानी मुंबईला जातात. मात्र तिथे या शेतकऱ्यांची राहण्याची मोठी तारांबळ उडते. आमदार निवास मध्ये नेहमीच राजकारण आडवे येते. त्यामुळे मुंबई येथे मंत्रालया लगत शेतकऱ्यांसाठी शेतकरी भवन उभा करा अशी आग्रही मागणी जनशक्ती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
आज जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे-पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे व महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई मंत्रालय येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा बुके देऊन सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी विनिता बर्फे यांनी मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना मोफत वीज द्या, सर्व कारखानदारांनी उसाची थकलेली एफ आर पी द्यावी, उसाचा चालू वर्षाचा साडे तीन हजार दर द्यावा, शेतकऱ्यांना हेलपाटे ना मारता वेगवेगळ्या बँकांनी कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षणाचा कोटा उपलब्ध करून द्यावा या मागणीसह शेतकरी भवन उभारावे ही प्रामुख्याने मागणी करण्यात आली. या सर्व मुद्यावर चर्चा करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हे सरकार सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे आहे त्यामुळे आपल्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असे सांगितले.
यावेळी वाशी शहर अध्यक्षा स्नेहा चांदोरकार, शीतल कदम, सामाजिक कार्यकर्ते डॅनी डिसोझा यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
मुख्यमंत्र्यांनी केले ‘जनशक्ती’चे कौतुक
– जनशक्ती संघटनाही अत्यंत तळागाळातून निर्माण झालेली कमी वयाची संघटना आहे. असे असताना देखील या संघटनेने महाराष्ट्रभर जाळे निर्माण केले आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे. शेतकरी, एस.टी. कर्मचारी, ऊस वाहतूकदारांसाठी, कारखानदारांच्या विरोधात नेहमीच आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनशक्ती संघटनेचे कौतुक केले.
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…