करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सन 2021-22 मध्ये झालेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विद्यालयातील एकूण 22 विद्यार्थी परीक्षेस बसलेले होते त्यापैकी 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत पैकी एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत 1व सारथी शिष्य वृत्ती मध्ये 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
एन.एन.एम.एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना चार वर्षाला प्रत्येकी 12 हजार रुपये प्रमाणे 48000 रुपये मिळतात.तर सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना चार वर्षाला प्रत्येकी 9 हजार 600 रुपये प्रमाणे 38 हजार 400 रुपये मिळतात.या प्रमाणे विद्यालयातील 8 विद्यार्थ्यांना एकूण 316800 तीन लाख सोळा हजार आठशे एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यामध्ये पवार तुषार हनुमंत एन.एम एम.एस शिष्यवृत्तीधारक तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी जगताप नम्रता नागनाथ,राखुंडे सार्थक अशोक,पवार श्रेया जोतीराम,सरडे यश किरण,कामटे ऋषिकेश संतोष,क्षीरसागर गिरीश सचिन,गव्हाणे वैष्णवी विकास वरील विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक व विभाग प्रमुख बिभीषण भोई यांचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, मध्य विभागाचे चेअरमन संजीव जयकुमार पाटील, मध्य विभागाचे इन्स्पेक्टर राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटी,शाळा व्यवस्थापन समिती,प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुराज माने व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या वेळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने,गुरुकुल विभाग प्रमुख साईनाथ लोहार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी मासाळ यांनी केले .यशस्वी विद्यार्थ्यांचे चिखलठाण व पंचक्रोशी मध्ये सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…