केत्तूर ता.7 रामवाडी (ता. करमाळा) येथे जिल्हा परिषद प्रा शाळा या ठिकाणी व्यसनमुक्ती मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन इंदापूर येथील शोभा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी केले.
यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातून दारू बंद झालेल्या रामवाडी गावातील दहा जणांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. या मेळाव्याला पुण्यातील ए ए सभासदांनी मार्गदर्शन केले आणि दारू मुक्ती साठी किंवा व्यसनमुक्तीसाठी ए ए संस्था कशा पद्धतीने काम करते यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना शोभा फाउंडेशनचे अध्यक्ष गौरव झांजुर्णे यांनी व्यसन हा एक आजार आहे त्यावर योग्य उपचार घेतल्यास माणूस व्यसनापासून लांब राहू शकतो त्यामुळे या व्यसनापासून कशा पद्धतीने लांब राहता येईल त्यासाठी शोभा फाउंडेशन कशा पद्धतीने काम करते याची माहिती दिली. आणि कोणालाही जर व्यसनाचा त्रास असेल तर (8551951515) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी राऊत यांनी व्यसन माणसाला आणि त्याच्या परिवाराला कशा पद्धतीने तळागाळाला घेऊन जाते याबद्दल मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी पोलीस पथकसुद्धा कशा पद्धतीने समाजातून दारू बंदीसाठी काम करत आहे याबद्दल माहिती दिली. सदरील कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन रामवाडी ग्रामस्थांनी केले व सूत्रसंचालन रामवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संतोष वारगड यांनी केले.
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…