पारेवाडी प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील तीनही राजकीय गटातील कट्टर प्रतिस्पर्धी लोक पारेवाडीत आहेत, परंतु गावातील धार्मिक कार्यासाठी हे तीनही गट आपापसातील राजकीय मतभेद विसरून एकत्र आल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले आहे. पारेवाडी ता. करमाळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या बांधकामाचे व आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या नियोजित सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील ह .भ. प धोंडोपंत दादा मठाचे प्रमुख ह. भ. प सुरवसे महाराज होते .
पंढरपूर येथील धोंडोपंत दादा यांच्या फडावर जी काही प्रमुख गावे आहेत यामध्ये पारेवाडीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लोकसहभागातून करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. याच कामाचे भूमिपूजन आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे, सूर्यकांत पाटील ,हरिभक्त परायण सुरवसे महाराज, ह. भ. प हांडे महाराज, मकाई सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब पांढरे, तानाजी बापू झोळ, उद्धव दादा माळी, महादेव नवले ,सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक अशोकरावजी पाटील, गणेश गुंडगिरे, हिंगणीचे सरपंच हनुमंत पाटील, डॉ गोरख गुळवे, दिवेगव्हाणचे सरपंच भरत खाटमोडे, अजित विघ्ने, लक्ष्मीकांत पाटील, सरपंच अमोल दुरंदे, दादासाहेब निकम, बाळकृष्ण भाऊ सोनवणे ,राजेंद्र धांडे, मारुती सोनवणे सर ,रामदास गुंडगिरे,पारेवाडी चे सरपंच महादेव पांढरे यांच्यासह परिसरातील नागरिक व पारेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम .व्ही गुंडगिरे यांनी केले तर आभार अमोल मोरे यांनी मानले.
पारेवाडी गावातील चव्हाण व गुंडगिरे वस्तीवर जाणारा रस्ता हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणे लोकांना खूप गैरसोयीचे ठरत आहे . याशिवाय ऊस वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यासाठी लवकरच निधीची तरतूद करून काम सुरू करू असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…