केत्तूर ( अभय माने) दिगंबरराव बागल विद्यालयात ,
जागतिक किर्तीचे वैज्ञानिक जॉन डाल्टन यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंदांसह विद्यार्थ्यांनी डाल्टन यांचे | प्रतिमेस अभिवादन केले.
करमाळा पंचायत समितीचे उपक्रमशिल आदर्श गटविकास अधिकारी मा. श्री.मनोज राऊत साहेब यांचे संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील जि.प. सह खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांनी जॉन डाल्टनचा अणूचा सिध्दांत व त्यांचे संशोधन या विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कल्याणराव साळुंके, सिताराम बनसोडे, संतोष शिंदे, विष्णू पोळ या शिक्षकांनी वैज्ञानिक जॉन डाल्ट्न यांच्या जीवनातील प्रसंगांविषयी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना माहिती दिली. माहिती दिली. दादा जाधव, बलभीम वाघमारे, किशोर कदम, संतोष घोरपडे, नंदकुमार कांबळे उपस्थित होते. मार्गदर्शन पर भाषणात श्री. पाटील म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण करणारा व जाणिवा समृध्द करणारा ठरत आहे. भविष्यात प्रज्ञावान व चिकीत्सक विद्यार्थी घडविणे हा उपक्रमाचा उद्देश असून करमाळा तालुक्यातील शिक्षण विभागातील हा उपक्रम संपूर्ण राज्यात अनुकरणीय ठरेल. येणाऱ्या काळात सर्जनशील विज्ञानवादी विचारांचे विद्यार्थी निर्माण होऊन या उपक्रमाची निश्चित यशस्वी फलश्रुती होईल असा आशावाद व्यक्त केला.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…