्करमाळा प्रतिनिधी जानेवारी 2021 मधे ढोकरी ग्रामपंचायत ची पंचवार्षिक सार्वत्रिकनिवडणूक पार पडून त्यामधे करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर व युवा कार्यकर्ते पैलवान शिवाजी खरात यांच्या नेतृत्वाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनेलला सात पैकी पाच जागांवर घवघवीत यश मिळाले होते . गटांतर्गत फार्म्यूला ठरल्याप्रमाणे साळुबाई बोरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर देवा पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीच्या वेळी प्रा बंडगर, पैलवान शिवा खरात, यांच्या सह माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य भामाबाई खरात,साळुबाई बोरकर,उपसरपंच राणी खरात ,सदस्य अनिल वळसे, उपस्थित होते. निवडी च्या वेळी बोलताना देवा पाटील म्हणाले की, प्रा. बंडगर व पै. खरात यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा चौफेर विकास करीन .ढोकरी गावात अभिनंदनाचे फ्लेक्स उभे करून तोफा उडवण्यात आल्या .या वेळी ग्रामस्थांनी नूतन सरपंच देवा पाटील यांचा सत्कार केला . या वेळी आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजी राव देशमुख, अक्षय निलकंठ देशमुख उपस्थित होते. हलगीच्या व बेंजोच्या निनादात गावभरातून मिरवणूक काढण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी श्री खारव यानी काम पाहिले .या वेळी तलाठी कुमारी बायणेवाड, ग्रामसेविका अनुराधा टकले उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग खरात तर आभार बाबासाहेब चौगुले यानी मानले.
करमाळा प्रतिनिधी दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात…
सांगोला प्रतिनिधी सांगोला नगरपालिका हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाला दोन गुंठ्यापर्यंत बांधकाम परवाना व…
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…