केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यात उसावर व वाढलेल्या गवतावर घोणस अळीचा सदृश्य विषारी अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वडगाव दक्षिण येथील एका शेतकऱ्याला याचा फटका बसला आहे. तो या घोणस अळीच्या संपर्कात आल्याने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.
अशाच प्रकारची विषारी घोणस अळी केत्तूर येथील शिवाजी पाठक यांच्या उसाच्या शेतात दिसून आली आहे. बेण्यासाठी ऊस तोडत असताना अळी खाली पडली होती. विषारी अळी आपल्या भागातही आली हे समजतात शेतकऱ्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
वारंवार बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पिकावर होत असतानाच आता ऊस आणि वाढलेल्या गवतावर हिरवट पिवळसर रंगाची आळी दिसून आली आहे. या अळीचा पिकावर परिणाम होतोच शिवाय माणसावर ही परिणाम होत आहे. या अळीचा अंगाला स्पर्श झाल्यास अंगाला खाज सुटत आहे तसेच भयंकर वेदनाही होत आहेत व नंतर उलट्या होऊ लागतात तर शरीर बधीर पडून बोलताना जीभ अडखळत आहे. या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच अळी अंगावर येऊ नये याची दक्षता घ्यावी असे करमाळा येथील डॉ.रोहन पाटील यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना हिरवट पिवळसर प्रकारची आळी दिसताच तण नाशकाची फवारणी करावी.तसेच शेतामध्ये काम करताना अंगभर कपडे घालूनच काम करावे.असे आवाहन कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी केले आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…