Categories: Uncategorized

ऐन सणासुदीमध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक हैरान प्रशासनाचा ढिम्म कारभार नगरपालिकेने नागरी सुविधा न दिल्यास आंदोलन करण्याचा नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी ऐन सणासुदीमध्ये पाण्याच्या टंचाईने नागरिक हैरान झाले असुन प्रशासनाचा ढिम्म कारभार असल्यामुळे नागरिकांना नागरी सुविधेपासुन वंचित रहावे लागत असुन पाण्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका सौ.स्वातीताई फंड यांनी दिला आहे.करमाळा नगरपालिकेवर सध्या प्रशासक असल्यामुळै नगराच्या सुविधेबाबत नगरसेवक व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसल्याने मुख्याधिकारी प्रांत अधिकारी यांचे नागरी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असुन त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाळयाच्या दिवसात पाणी टंचाई,शहरात असणारी अस्वच्छता गटारीच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे त्यामुळे गटारीच्या स्वच्छता न करता आल्यामुळै तुंबलेल्या गटारी महावीर उद्यान, गणेशनगर शाहुनगर,कृष्णाजीनगर,या भागातील बागेत झाडझुडपे वाढल्याने साप विंचु यांचै भय असुन रोगराई होण्याची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असुन‌ याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन नागरी सुविधा न दिल्यास तसेच उजनी धरण शंभर टक्के पुर्ण भरूनही करमाळा शहराला पाणी नगरपालिका पाणी पुरवठा करु शकत नाही हे मोठे दुर्दव असुन धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असुन पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवुन पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास करमाळा नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा  सौ.स्वातीताई फंड यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा पिसे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दगडी रोड येथील रहिवासी शारदा सुरेश पिसे (वय ७१) यांचे अल्पशा…

22 mins ago

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची…

5 days ago

दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भातील बैठक आमदार.नारायण (आबा)पाटील यांनी जेऊर येथे न घेता करमाळा येथे पंचायत समिती सभागृहात घ्यावी- ॲड. अजिनाथ विघ्ने उपसभापती पं.स.करमाळा

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्याची दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक आमदार. नारायण( आबा) पाटील यांचे…

1 week ago

डॉ अजिंक्य पवार यांची एम.डी. परीक्षेत यशस्वी भरारी; जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन डॉ. रविकिरण पवार कुटुंबीयांचा अभिमान उंचावला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

करमाळा : प्रतिनिधी मेहनत, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. अजिंक्य रविकिरण…

1 week ago

प्रा. डॉ. महेश निकत यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव

  करमाळा, प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा यांचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मच्छिंद्र…

1 week ago