गेल्या दहा दिवसाच्या पाहूनचारानंतर लाडक्या बाप्पांनी शुक्रवारी निरोप घेतला. श्री गणेश चतुर्थीला मोठ्या आनंदात उत्साहात व जल्लोषात भाविकांनी गणरायाचे आगमन केले त्यावेळी असणारा तोच आनंद आणि उत्साह गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर विसर्जनाच्या यावेळी दिसून येत होता.केत्तूर (ता. करमाळा) येथील श्री किर्तेश्वर तरुण मंडळाने गुरुवारी तर सुयश स्पेशल गाईडन्स, हनुमान मित्र मंडळ , बजरंग मित्र मंडळ व इतर बाल गणेश मंडळांनी शुक्रवारी गणरायाचे विसर्जन केले.तर सकाळपासूनच घरगुती गणेश भक्त बाप्पा मोरयाचा जयघोष करीत गणेश मूर्ती विसर्जनासाठी उजनी जलाशयाकडे घेऊन जाताना दिसत होते. यावर्षी विसर्जन मिरवणूक गुलालाचा वापर कमी प्रमाणात असल्याचे प्रकर्षाने दिसून आले.कोरोना संकटानंतर दोन वर्षांनी प्रथमच विना निर्बंध गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…