*
करमाळा तालुक्यातील राजकारण हे पुर्वीपासुन गटातटावर अवलंबुन होते, पुर्वीचे जगताप गट आणि मोहीते- पाटील गट यामधेच राजकारण घडायचे,पुढे मोहितेंच्या आशिर्वादाने बागल गट उदयाला आला आणि मग तालुक्यातील कार्यकर्त्याचा वावर जगताप गट आणि बागल गट यांच्याकडेच होऊ लागला.. करमाळा तालुक्याच्या राजकारणात एवढी उलथापालथ झाली की त्यावेळी कार्यकर्ता बागल गटातुन नाराज झाला की, जगतापांकडे आणि जगताप गटाकडुन नाराज झाला की परत बागलांकडे. दोनच गट असुनही कार्यकर्त्यांना स्पेस नव्हता म्हणुन की काय पुढे पाटील गट उदयाला आला.. आणि त्यातच आमदार संजयमामांच्या एण्ट्री ने शिंदे गट ही उदयास आला.. वस्तुस्थिती पाहीली तर जगताप गटापासुन ते शिंदे गटापर्यंत सर्वांकडे आमदारकी आणि तालुक्यातील इतर सहकारी संस्थावर सत्ता होती व आहे… आज आमदारकी शिंदे गटाकडे आहे, आणि साहजिकच नेते आणि कार्यकर्त्याचा ओढा आमदार संजयमामा यांचेकडे होत आहे.. *शिंदे गट विस्तारतोय.. मामांच्या एन्ट्रीने तालुक्यातील राजकीय पटलावर अनेक महत्वपुर्ण बदल घडताना दिसत आहेत..जे करमाळा तालुक्याचे दृष्टीने फायदेशिर आहेत..* आज करमाळा तालुक्यातील गावोगावी एकीचे दर्शन घडत आहे आणि यासाठी आमदार मामांचे संयमी नेतृत्वही कारणीभुत ठरत आहे…*गावागावातील नेते, कार्यकर्ते यांना मामांनी केलेले मार्गदर्शन पचनी पडत असुन, गावागावात आणि घराघरात एकी घडवुन आणली तर त्याचा परिणाम सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे.. ही बाब जनसामांन्याना मनापासुन पटलेली असुन आज करमाळा तालुक्यातील अनेक गावे एकत्रित होवुन आमदार संजयमामांच्या नेतृत्वाखाली राजकीय समिकरणे बदलविण्याच्या तयारीत आहेत..* ज्या गावांमधे राजकारण इतके तीव्रतेचे होते की तिथली माणसे या राजकारणामुळे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी झाले आणि अक्षरशः आपल्या विरोधकाच्या लग्नाला आणि मयताला सुद्धा जाणेचे टाळत होते… याचाच गैरफायदा आजपर्यंत नेतेमंडळी शिताफीने ऊचलत होती.. आता मात्र तालुक्यातील अनेक गावागावात निवडणुकां पुरते राजकारण होत आहे.. एकदा का निवडणूक झाली की मग सर्व हेवेदावे विसरून लोक एकत्र येत आहेत… करमाळाच्या पश्चिम भागातील तर अनेक गावांमधे अतिशय खेळीमेळीने राजकारण चालते… *वस्तुतः अनेक गावांनी एकजुटीच्या जोरावर विकासकामात अग्रेसर भुमिका घेतली आहे… आणि इतिहास रचला आहे… केत्तुर- पोमलवाडी सारख्या गावांनी लोकवर्गणीतुन कोटयावधीचे पुल ऊभारले.. दिवेगव्हाण गावातील लोकांची एकजुट अशी की त्यांनी एक ते दिड कोटीचे विठ्ठल मंदीर उभारले आहे… आता पारेवाडीला भव्य दिव्य मंदिर होत आहे.. कोंढार चिंचोली सारख्या एका छोट्याशा गावाने प्राथमिक शिक्षणाला महत्व देऊन गावचा आणि शाळेचा परिसर सुधारणा करून एक मॉडेल तयार केले आहे*….. हे सर्व घडते ते फक्त दबाव रहीत राजकारणामुळे… सक्षम आणि प्रगल्भ विचाराच्या नेतृत्वामुळे!.. सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणात एक काळ मोहीते पाटलांचे शिवाय कसले पान सुद्धा हलत नव्हते, मात्र कार्यकर्त्यांना आणि नेत्यांचा समन्वय आणि संपर्क न ठेवल्यामुळे आणि दबावतंत्राचे राजकारणामुळे हळुहळु प्रत्येक तालुक्यातील मंडळी बंड करून स्वतंत्र झाली, त्यामुळे दबावाचे राजकारण हे अल्पावधीचे ठरते हे सर्वश्रुत आहे… माढा तालुक्यात आमदार. बबनदादा शिंदे यांचे नेतृत्व यातुनच तयार झाले आणि आज माढा तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य त्यांनी केले आहे.*माढा तालुक्यातील गावे आणि तिथले राजकारण पाहीले तर गावातले दोन्ही गट हे प्रतिस्पर्धी असुनही एकाच नेतृत्वाकडे विश्वासपुर्ण राहतात आणि विकासकामांना प्राध्यान्य देतात….आणि हाच पॅटर्न आता हळुहळु करमाळा तालुक्यात रुजतोय… गावागावातले कार्यकर्ते एकमेकांचे कट्टर विरोधक असणारी मंडळी एकाच स्टेजवर येत आहेत.. हे घडतय फक्त आमदार संजय मामांच्या एण्ट्रीने .. कारण सर्वांना सामावुन घेण्याची शक्ती मामांकडे निश्चित आहे.. राजकारणाबरोबरच युवकांनी उदयोग, व्यवसाय, शिक्षण याही गोष्टींना प्राध्यान्य द्यावे असे मामांचे स्पष्ट मत असुन… विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी असुन, ऊगाचच मोर्चे आणि आंदोलने आणि इतर गोष्टीत तरुण कार्यकर्त्यांनी अडकण्यापेक्षा उद्योगधंद्यात, शेती धंद्यात लक्ष दिले पाहीजे असे ते नेहमी सांगतात..*स्वार्थासाठी नेत्यांनी एकत्र येण आणि स्वार्थासाठी कार्यकर्त्यांनी आणि जनसामान्यांनी एकजुट करणे* या बाबींमधे जरी साम्य वाटले तरी नेत्यांनी एकत्र येणे ही बाब म्हणजे विरोधात असणाऱ्या एखाद्या राजकीय महाशक्तीचा विरोध करण्यासाठीची ती युती असते, जी पुन्हा तुटणार असते… परंतु जनसामान्यांची झालेली एकजुट ही राजकारण विरहीत आणि गावाच्या विकासाला गती देणारी असते आणि हीच गोष्ट आज करमाळा तालुक्यात दिसत आहे.. अक्षरशः राजकारणाच्या नादात एकमेकांची डोकी फोडणारी मंडळी सुद्धा आज एकत्र येत आहेत…. कोंढार- चिंचोली पासुन आवाटी पर्यंत आणि जातेगाव पासुन कंदर पर्यंत चा तालुक्यातील प्रत्येक गावातला माणुस स्वतः आमदार संजयमामांना भेटतो आणि आपल्या कामांची सोडवणुक तात्काळ करून घेतोय, मामाही आपला प्रत्येक वेळ तालुक्याच्या जनतेसाठी देत आहेत, जनतेच्या कामानिमित्त मुंबई, दिल्ली चे दौरे सोडुन इतर वेळी पुर्णवेळ तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक सुख दुःखात आमदार संजयमामा यांची उपस्थिती आहे.. विशेष म्हणजे अतिशय नम्र आणि मितभाषी असणारा हा नेता कोणत्याही राजकीय विरोधकांवर कसलीही टिका-टिप्पणी न करता आपले काम पुढे नेत आहे.. सोलापुर जिल्ह्याच्या या संयमी नेतृत्वाची झलक महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातही दिसत असुन, त्यांचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचेवरील प्रेम, निष्ठा नेहमीच दिसुन आली आहे, राज्याच्या राजकारणातील त्यांची माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे बरोबरची मैत्री सर्वश्रुत आहेच आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार, मंत्र्यापासुन, मंत्रालयातील मुख्य सचिव आणि अधिकारी वर्गाशी असलेले घट्ट नाते देखिल पहायला मिळते.. त्यामुळे आमदार संजयमामां कडुन कोणतही काम अगदी चुटकी सारखं होतं हे आम्ही पहात आहोत.. ते संयमी तर आहेतच परंतु त्यांचा दराराही तेवढाच आहे.. महाराष्ट्रातील मागिल काही राजकीय घडामोडीत खासदार संजय राऊत यांनी मामांचे नाव घेऊन आमदार फुटीचे वक्तव्य केले होते परंतु अशाही परिस्थितीत मामांनी संयमाने या वरिष्ठ नेत्याला जे उत्तर दिले ते वाखणण्या सारखे आहे. त्यामुळेच अशा संयमी नेतृत्वाच्या पाठीशी जनता ऊभी राहत आहे.. करमाळ्याच राजकारण आता बदललय हे नक्की, गावागावतली माणसे गट-तट विसरून विकासाचे मुद्द्यावर एकत्र येत आहेत.*हे घडतयं ते फक्त एका सक्षम नेतृत्वाच्या एन्ट्रीने*.. *करमाळ्याच्या लोकांना वादापेक्षा विकास पाहीजे आहे.. त्यामुळेच आमदार. संजयमामा शिंदे यांचा विकासाबरोबर एकजुट होण्याचा कानमंत्र राजकारणाची दिशा बदलविणारा असेल.*
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…