करमाळा प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी जपत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना भोजन देण्याचा श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी व्यक्त केले. करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते श्रीराम प्रतिष्ठानमार्फत याही वर्षी सामाजिक बांधिलकी जपत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना दोन. वेळचे जेवण देण्यात आले, श्रीराम प्रतिष्ठान हे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबित असते, यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना रोज संध्याकाळी मोफत भात – भाजी वाटप तसेच करमाळा शहरातील वृद्ध निराधार लोकांना दोन वेळचे जेवण देत असते असे सामाजिक उपक्रम करत असताना गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जे पोलीस बांधव बंदोबस्तासाठी असतात अशा कर्मचाऱ्यांना मिरवणुकीमध्ये हॉटेल व दुकाने बंद असल्यामुळे जेवणाचे हाल होऊ नये यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाचे करमाळा पोलीस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक मा.जोतीराम गुंजवटे साहेब यांनी कौतुक करत श्रीराम प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले ,यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, काकासाहेब सरडे, अमोल पवार, पप्पू शिंदे, दिनेश गायकवाड करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस बंधू व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…