करमाळा प्रतिनिधी करमाळयातील कमलाई साखर कारखान्याच्या संचालक पदी पूर्व भागाचे नेते श्री समाधान भोगे यांची निवड झाल्याबद्दल बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर पोलीस पाटील अकोला श्री शिवाजी पाटील मिरगव्हाणचे युवा नेते श्री श्रीराम घरबुडे यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला यावेळी समाधान भोगे म्हणाले की शेतकऱ्यांचा ऊस प्रोग्रामप्रमाणेच गाळप केला जाणार आहे ऊस तोडताना शेतकऱ्यांची जी लूट चालू होती ते बंद करणार आहे. शेतकऱ्याकडून कुठल्या ऊसतोड मजूर किंवा वाहन मालकांनी पैसे घेतले तर त्याची गय केली जाणार नाही शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला जाईल. कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन श्री विक्रम दादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाई साखर कारखाना चांगल्या पद्धतीचे ऊस गाळप करत आहे व शेतकऱ्यांना चांगला ऊस दर देत आहे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्राधान्य सोडवल्या जातील असे त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…