संस्कृतीचा वारसा जपुन गणेशोत्सवात पंचवीस वर्ष प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले फंडगल्ली येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळ लय भारी

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ फंड गल्ली येथील एक आदर्श मंडळ असुन यंदा या गणेश तरूण मंडळाला 74 वर्ष पुर्ण झाले आहे .गणेशोत्सवाबरोबर सामाजिक बांधिलकी जपुन समाजसेवेचे व्रत जपण्याचे काम केले असुन लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा समाजसुधारणेचा वारसा गणेशोत्सवाच्या माध्यमातुन जपला आहे. गणेशोत्सव साजरा करीत असताना राष्ट्रीय एकात्मता,हिंदु मुस्लिम एकता, व्यसनमुक्ती, साक्षरता,शेतकरी आत्महत्या निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन,मुलगा मुलगी समान या सामाजिक विषयावरील प्रबोधन देखावे साजरे करत पंचवीस वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे. या मंडळाची मिरवणुक म्हणजे शहरवासीयासाठी सांस्कृतिक ठेवा जपणारी ठरली असुन याची सुरूवात श्री गणेशाची आरती मार्गदर्शक विलासराव घुमरे सर कन्हैय्यालाल देवी यांच्या हस्ते करून झाली पांरपारिक वाद्य वाजवत गणपतीची मिरवणुक मोठया उत्साहात आनंदामध्यै गणेशाचे गुणगान गात लेझीम नृत्य करत काढण्यात आली.ना डाॅल्बी ना गुलालाची उधळण ना धांगधिगा शिस्तबध्द पध्दतीने सांस्कृतीक वारसा जपत संस्कृतीचे दर्शन घडवत गणेशाची वंदना करत ही मिरवणुकीत संप्पन झाली‌ या मंडळाचे वैशिष्ठ म्हणजे या मंडळात लहान थोरापासुन सर्व जाती धर्माचे गुण्यागोविंदाने या उत्साहात सहभागी होतात. इतर गणेशमंडळाचा विचार करता नुसता धांगडधिंगा पिक्चर गाण्यावर नृत्य गुलालाची बेसुमार उधळण करत मद्यंधुंद अवस्थेत मिरवणुक न काढता आदर्श नियमांचे पालन करून करमाळा शहरात आपल्या हिंदु संस्कृतीचे जतन करत गणेशोत्सव साजरा करण्याची पंरपंरा जपल्याने लोकमान्य टिळक तरूण मंडळाचे शहरवासियाकडुन सर्वत्र कौतूक होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

9 hours ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

23 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

24 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

4 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago