केत्तूर ( अभय माने) कृषि उत्पन्न बाजार समिती इंदापूर संचलित भिगवण उपबजारामधील मासळी बाजारात आज सहा किलो वजनाच्या दुर्मिळ अशा चित्तल माशाची ६०० रु किलोप्रमाणे विक्री करण्यात आली. हा इतर माशांपेक्षा वेगळा असलेला हा मासा उजनी जलाशयात सापडला आहे. साई फिशरीजचे मालक विजय वाघमोडे व सतीश वाघमोडे यांनी या माशाबद्दल दिलेल्या माहितीनुसार सकाळी वाटलुजचे मच्छिमार अर्जुन नगरे याच्या जाळ्यात आज दुर्मिळ चित्तल मासा अडकला होता. सदरील मासा मत्स्यव्यापारी बाबा गिते यांनी उच्चांकी बोली लावून खरेदी केला.
चितल हा मासा मांसाहारी असून तो सामान्यपणे जलकीटक, झिंगामासा, खेकड्यासारखे संधीपाद, पाण्याच्या तळाशी असलेल्या चिखलातील क्रिमी व इतर लहान माशांना भक्ष्य ठरवतो. या माशाला खास करून शांत व संथ वाहणाऱ्या पाण्यात राहण्यास आवडतो. या प्रजातींचे वास्तव्य प्रामुख्याने नैसर्गिक स्रोत जसे की नदी, तलाव, कालवयातील पाण्याच्या फुगवटा, तळे, धरणे अशा ठिकाणी असते. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त तलावात या माशांचे कृत्रिमरीत्या संवर्धन केले जाते. हा मासा अतिशय कणखर असून कमी प्राणवायू असलेल्या पाण्यातदेखील जोमाने वाढतो. त्यांचा प्रजनन ऐन पावसाळ्यात असतो. प्रजनन कालावधीत हा मासा गोड्या पाण्याकडून निमखाऱ्या पाण्याकडे प्रजननासाठी जातो. प्रजनन सर्वसाधारणपणे चितळ मासे धरणाच्या पाण्यात, तळ्यात, पान वनस्पतींवर अथवा दलदलीच्या ठिकाणीदेखील अंडी घालतात. प्रजनन काळात ते गढूळ पाण्यात जमिनीला खड्डे करून राहतात. चितल मासे आपल्या पिल्लांची काळजी घेत पालकत्व स्वीकारले जातात. त्यांची पिल्ले मोठी होईपर्यंत पालकांबरोबर राहत असतात.
” इंग्रजीत या माशाला नाईफ फिश या नावाने ओळखतात. याचे कारण म्हणजे या माशाच्या शरीराचा आकार चाकू सारखा असतो. शरीराचा अग्रटोक चाकूच्या टोकासारखा असल्यामुळे या माशाला चिखलातील कृमी कीटक टिपायला सोपे जाते. शिवाय प्रजनन काळात अंडी -पिल्लाची काळजी घेण्यात उपयोगी पडते. उजनीच्या पाण्यात सापडलेल्या या आगळावेगळा माशामुळे उजनी धरणाच्या मत्सवैविध्येत भर पडली आहे.
– डॉ. अरविंद कुंभार, प्राणिशास्त्र अभ्यासक
” उजनी जलाशयातील मूळ जातीचे अनेक मासे वरचेवर संपुष्टात येत असताना गेल्या काही दिवसापासून दुर्मिळ व नवीन जातीचे मासे उजनी जलाशय सापडत आहेत ही उजनीसाठी आशादायक बाब आहे.
– कल्याणराव साळुंके, कुंभेज
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…