करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे ऑक्टोंबर २०१८ मधे जि.प सदस्या सौ .राणी वारे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधून माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांची करमाळा न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम पी इखे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे .करमाळा बाजार समितीच्या सभापती पदी निवडी दिवशी घडलेल्या पेचप्रसंगातून ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी सौ .राणी संतोष वारे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांच्या विरोधात भारतीय दंड संहीता कलम ४५२,१४३,१४७,१४९,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता . सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करून संशयितां विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या मधे साक्षी, पुरावे, जबाब व सुनावणी झालेनंतर संशयितांचे विधिज्ञ ॲड कमलाकर वीर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरीत करमाळा न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती एम पी इखे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व जयराज चिवटे यांना सदरच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे. यामधे माजी आमदार जगताप व अन्य संशयितांच्या वतीने ॲड कमलाकर वीर, सरकारच्या वतीने ॲड सचिन लुणावत यांनी काम पाहीले . काही दिवसांपूर्वीच याच दिवशी दाखल झालेल्या जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणेसारख्या दुसऱ्या गुन्ह्यातून बार्शी येथील सत्र न्यायाधीश जे सी जगदाळे यांनी माजी आमदार जगताप व अन्य सहा जणांना दोषमुक्त केले होते . दरम्यान राजकीय सत्तासंघर्ष व वैमनस्यातून लोकप्रतिनीधीं वरच जर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय? अशी देखील सामान्य नागरीकांमधे दबक्या आवाजात चर्चा आहे . याबाबत सर्वच राजकीय पक्ष व गटातटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी गांभिर्यांनी विचार करण्याची गरज आहे अन्यथा या घटनांचा सामाजीक स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होवून याचे दुष्परीणाम सर्वांनाच भोगावे लागणार असल्याची देखील जनतेत चर्चा आहे . दरम्यान या न्याय निर्णयांमुळे जगताप समर्थकांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहे .
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…