करमाळा प्रतिनिधी सोलापुर जिल्हा शिक्षक
लोकशाही आघाडी(टीडीएफ) व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे देण्यात येणारे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथील फॅबटेक कॉलेज या ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील , माजी आमदारव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मा .दीपकआबा साळुंखे पाटील ,पुरोगामी युवक शेकाप चे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य प्रबुद्धचंद्र झपके सर व फॅबटेक कॉलेजचे प्रमुख श्री भाऊसाहेब रुपनर या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रम संपन्न होणार आहे .
तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माध्यमिकचे विभाग सोलापूर शिक्षणाधिकारी श्री भास्करराव बाबर ,लातूर विभागाचे विभागीय सहसचिव मारुतीराव फडके, पुणे विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री जी.के. थोरात ,माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री शिवाजीराव जमाले सर ,सीनियर ऑडिटर सोलापूर श्री दयानंद कोकरे व गटशिक्षणाधिकारी सांगोला महारुद्र नाळेसाहेब या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा शिक्षक लोकशाही (टीडीएफ)आघाडी व माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय पुरस्कार पुढील प्रमाणे अक्कलकोट – श्री संजय कुमार गंगे सर ,करमाळा -श्री बाळासाहेब देशमुख ,माळशिरस -श्री संजय पवार ,मोहोळ -बशीर बागवान ,माढा -शिवाजी लोखंडे, पंढरपूर- पांडुरंग गायकवाड, सांगोला -दत्तात्रय लोखंडे, बार्शी- संतोष साळुंखे, मंगळवेढा- अशोक वाले, उत्तर सोलापूर- संतोष भोरे ,दक्षिण सोलापूर- परसप्पा आडपद, सोलापूर शहर- कानिफनाथ खोबन,
विशेष जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार- विजयकुमार वाघमोडे ,आदर्श महिला शिक्षिकासौ. स्नेहा मसरे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी दादा पाटोळे आणि जीवन गौरव पुरस्कार श्री शिवाजीराव जमाले सर तसेच विशेष पुरस्कार मोहन गायकवाड सर व तुकाराम मेटकरी सर यांना देण्यात येणार आहेत.
वरील सर्व मान्यवरांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा व सांस्कृतिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत त्यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजक सांगोला तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडीचे सर्व पदाधिकारी व सदस्य आहेत. सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष -भारत इंगवले ,कार्याध्यक्ष -मुकुंद साळुंखे ,सचिव -सचिन झाडबके, टीडीएफचे जिल्हाध्यक्ष -हरिदास जाजनूरे ,सचिव- हनुमंत जोडबोटे, कार्याध्यक्ष -मोहन गायकवाड सर. उपस्थित राहणार आहेत.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…