करमाळा प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस आय चे सर्वेसर्वा मा.राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण तयार होत असल्याचे प्रतिपादन करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी केले ते मौजे पाडळी येथील शाखेच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले कि सध्या मा.राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो पदयात्रा सुरु असुन वेगवेगळ्या राज्यातुन सदर पदयात्रा जाणार असल्याचे पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.येणाऱ्या काळात जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष हाच एकमेव पर्याय असुन जनतेलाही आता बदल हवा आहे.येणाऱ्या काळात करमाळा तालुक्यातही काँग्रेस पक्षाला नक्कीच चांगले दिवस येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.सध्या पाळीव प्राण्यांमध्ये लंपी नावाच्या रोगाने थैमान माजवले असल्याने शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असुन त्यासाठी सर्व शेतकरी बंधुनी उपलब्ध असलेल्या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी श्री प्रतापराव जगताप यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, सुजय जगताप, उत्तरेश्वर सावंत,नितीन चोपडे,उपस्थित होते.यावेळी शाखेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर वायकर,शाखा उपाध्यक्ष शाम जगताप,खजिनदार किरण वायकर,सचिव हसन मुलाणी,सहखजिनदार आप्पा जगताप,सहसचिव शिवाजी जगताप यांनी मनोज दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे नियोजन केले होते.यावेळी शाखेच्या वतीने प्रतापराव जगताप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील अनेक युवक व जेष्ठ नागरीक उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…